अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर उत्तर द्या : रवींद्र वायकरांना कोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:11 AM2024-09-03T07:11:45+5:302024-09-03T07:12:36+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
अमोल कीर्तिकर यांना अवघ्या ४८ मतांनी पराभूत करून मुंबईच्या उत्तर (पश्चिम) लोकसभा मतदारसंघातून वायकर खासदार म्हणून निवडून आले. वायकर यांची निवडणूक अवैध ठरवून आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी कीर्तिकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्या. संदीप मारणे यांनी वायकरांना उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.