मिहीर शहाच्या याचिकेवर उत्तर द्या : उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:01 AM2024-08-22T06:01:21+5:302024-08-22T06:01:29+5:30
मिहीरची बीएमडब्ल्यू गाडी एका दुचाकीला धडकून कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले होते.
मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा व त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना बुधवारी दिले.
मिहीरची बीएमडब्ल्यू गाडी एका दुचाकीला धडकून कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी ९ जुलै रोजी मिहीरला अटक केली. अपघाताच्या वेळी मिहीर शहाचा ड्रायव्हर राजऋषी बिडावतही गाडीमध्ये होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली.