मे महिन्यापर्यंत सादर करणार अहवाल

By admin | Published: March 23, 2017 01:51 AM2017-03-23T01:51:50+5:302017-03-23T01:51:50+5:30

एसटी महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी वेतनश्रेणी सुधार अभ्यास गटाची स्थापना २0१६च्या

Report to be submitted to May | मे महिन्यापर्यंत सादर करणार अहवाल

मे महिन्यापर्यंत सादर करणार अहवाल

Next

मुंबई : एसटी महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी वेतनश्रेणी सुधार अभ्यास गटाची स्थापना २0१६च्या जुलै महिन्यात करण्यात आली. या समितीकडून फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदतवाढ मागितल्यानंतर, पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी अहवाल सादर करण्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत समितीकडून अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली.
गेल्या ६८ वर्षांत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीच रचनात्मक व्यवस्था निर्माण झालेली नाही. दर चार वर्षांनी विशिष्ट पद्धतीने कामगारांना वेतनवाढ दिली जाते. कामाचे स्वरूप आणि मिळणारे वेतन याचा संबंध जुळवून वेतननिश्चिती झाली पाहिजे, याच उद्देशाने वेतनश्रेणी सुधार अभ्यास गटाची निर्मिती गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात करण्यात आली. या अभ्यास गटाच्या शिफारसी २0१६च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सादर केल्या जाणार होत्या, परंतु समितीकडून मुतदवाढ मागितल्यानंतर २0१७ च्या फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. मात्र, परिवहनमंत्र्यांनी समितीला आणखी अभ्यास करा, अशा सूचना देत, मे महिन्यापर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे एसटीच्या लाखो कामगारांना वेतनवाढीची असणारी अपेक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही समिती स्थापन केल्यावर त्याच्या अहवालानुसार, कामगार वेतन करारातच वेतनवाढ मिळेल, अशी चर्चा लाखो कर्मचारी व कामगारांमध्ये आहे. परंतु या समितीचा आणि कामगार कराराचा कोणताही थेट संबंध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Report to be submitted to May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.