जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद येथे करा; महापालिका तयार करतेय माहिती पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:36 AM2019-02-19T05:36:08+5:302019-02-19T05:36:42+5:30

महापालिकेच्या ४३ खात्यांद्वारे दिल्या जाणाºया सुविधांबद्दल विचारल्या जाणाºया प्रश्नांचे संकलन व्यवसाय विकास खात्याद्वारे करण्यात येत आहे.

Report birth, death and marriage; Information booklet prepared by municipal corporation | जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद येथे करा; महापालिका तयार करतेय माहिती पुस्तिका

जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद येथे करा; महापालिका तयार करतेय माहिती पुस्तिका

Next

मुंबई : जन्म-विवाह-मृत्यू नोंदणी कुठे व कशी करावी? नळ जोडणीसाठी अर्ज कुठे करावा? इमारतीच्या पुनर्विकासासाठी कुठे अर्ज करावा? नावे असलेल्या जुन्या मतदार यादीच्या प्रती कुठे मिळतील? दुकानाची नोंदणी कुठे करावी? आर.टी.ई. अंतर्गत शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावे? बाळाला कुठली लस केव्हा द्यावी? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. या प्रश्नांची उत्तरे कुठे मिळतील? त्याची माहिती नसल्यास वेळ, पैसा जातो. मेहनतही होते. इतके करुनही अधिकृत माहिती योग्य प्रकारे व वेळेत मिळेलच, याची शाश्वती नसते. या बाबी लक्षात घेऊन विविध खात्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांविषयी विचारल्या जाणाºया प्रश्न व उत्तरांचे संकलन असणारे पुस्तक प्रकाशित होणार आहे. मराठी व इंग्रजी भाषेत तयार होत असलेल्या या पुस्तकाच्या निर्मितीचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच हे पुस्तक महापालिकेच्या संकेतस्थळावर मोफत; तर छापील स्वरुपात सशुल्क उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या ४३ खात्यांद्वारे दिल्या जाणाºया सुविधांबद्दल विचारल्या जाणाºया प्रश्नांचे संकलन व्यवसाय विकास खात्याद्वारे करण्यात येत आहे. खात्याचा चमू या पुस्तकाच्या निर्मितीसाठी काही महिने माहिती संकलन करत आहे. ४३ खात्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य खाते, इमारत प्रस्ताव खाते, शिक्षण खाते, नागरी दारिद्रय निर्मूलन कक्ष, अनुज्ञापन खाते, उद्यान खाते, मनपा तरण तलाव, मुंबई अग्निशमन दल, दुकाने व आस्थापना खाते, मलनि:सारण खाते, निवडणूक खाते, मालमत्ता कर इत्यादीं विषयीच्या माहितीचा समावेश आहे.

च्व्यवसाय विकास खात्याद्वारे प्रश्नांचे संकलन केले जात असताना त्या प्रश्नांना अनुरुप उत्तरांचे संकलन करण्यात
येत आहे.
च्प्रश्नोत्तर पद्धतीने उपलब्ध झालेली ही माहिती
सहजपणे समजेल अशा पद्धतीने मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक स्वरुपात नागरिकांना लवकरच उपलब्ध होणार आहे.
च्पुस्तकाची संगणकीय प्रत मोफत स्वरुपात महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक दर तीन वर्षांनी सुधारित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

पारदर्शकता, अनुमानता आणण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने विविध सेवांवर वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न संकलित करुन प्रसारित करणार आहोत. कामकाज आणि सेवा पुरविण्याच्या कार्यप्रणाली संबंधीची संकलित माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
- अजोय मेहता, आयुक्त,
मुंबई महापालिका
 

Web Title: Report birth, death and marriage; Information booklet prepared by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.