Join us

आचारसंहिता भंगाची तक्रार करा थेट निवडणूक आयोगाकडे; एकदम सोप्पंय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:30 PM

आदर्श आचारसंहितेच्या भंग झाल्याची तक्रार थेट भारत निवडणूक आयोगाकडे करता येते.

मुंबई: मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत असून विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हीजील’या अ‍ॅप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व व्होटर्स हेल्पलाईन ही अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तीनही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या भंग झाल्याची तक्रार थेट भारत निवडणूक आयोगाकडे करता येते. निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या खोट्या बातम्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, मतदारांना पैशाचे वितरण, मद्य अथवा मादक पदार्थांचे वितरण, शस्त्रांचे अवैध प्रदर्शन, धाकदपटशा, सांप्रदायिक द्वेषयुक्त भाषण, पैसे देऊन छापलेली बातमी (पेड न्यूज), वस्तूंचे मोफत वितरण, विनामूल्य वाहतूक सेवा आदी बाबींची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल’ या अ‍ॅपचा वापर करू शकतात. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळून आल्यास त्याचे छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून ते या अ‍ॅपवर अपलोड करता येते.

निवडणुकीत दिव्यांग नागरिकांना विशेषत: विकलांग नागरिकांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ विकसित केले आहे. याद्वारे विकलांग व्यक्ती म्हणून सुलभतेने नोंद करता येते, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावाचे हस्तांतरण, मतदार यादीतील नावामध्ये सुधारणा अथवा नाव वगळणे, व्हिलचेअरसाठी विनंती, मतदान केंद्र शोधणे, अर्जाची स्थिती पाहणी आदी बाबीही सुलभ होतील.‘व्होटर्स हेल्पलाईन‘ या अ‍ॅपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणे, नवीन अर्ज अथवा यादीतील नावाचे हस्तांतरण सहज शक्य होते. निवडणूक सेवाविषयक तक्रारी नोंदविता येतात व त्याची स्थिती समाजवून घेता येते. मतदान, निवडणूक, इव्हिएम, निकाल यासंदभार्तील शंकांचे निरसन, निवडणुकांचे वेळापत्रक, उमेदवारांची माहिती, निवडणूक अधिकाºयाची माहिती निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी आदी माहिती या अ‍ॅपवर मिळू शकते. मतदानानंतर सेल्फी अपलोड करण्याची सुविधाही यामध्ये आहे. 

टॅग्स :निवडणूकभारतीय निवडणूक आयोगआचारसंहिता