Join us

आयुक्तांवर गुन्हा नोंदवा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:51 AM

बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिका आयुक्त व संबंधित

मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाºयांवर निष्काळजीचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यापारी संघटनेने उच्च न्यायालयात सादर केली आहे.‘फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ यांनी ही जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर केली आहे. सध्या मुंबईत अस्तित्वात असलेल्या मॅनहोल्सची पाहणी करण्यासाठी व मॅनहोल्ससंदर्भात सूचना देण्यासाठी माजी सनदी अधिकारी व तांत्रिकांची समिती नेमावी, अशी विनंती या व्यापारी संघटनेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.तसेच मुख्य सचिव, महापालिका, महापालिका आयुक्त आणि अन्य संबंधित अधिकाºयांनी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंतीही व्यापारी संघटनेने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशीही विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.मंगळवारी काम आटपून डॉ. अमरापूरकर घरी जाण्यासाठी निघाले होते. एलफिन्स्टनला रस्त्यात पाणी असल्याने त्यांनी ड्रायव्हरला घरी कार आणण्यास सांगून चालत जाण्याचा निर्णय घेतला. ते ज्या ठिकाणी कारने उतरले त्या ठिकाणाहून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर त्यांचे घर होते. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने उघडलेल्या मॅनहोलमध्ये अमरापूरकर पडले. ३६ तासांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा येथे सापडला. उघड्या असलेल्या मॅनहोलजवळ पालिकेने साईनबोर्ड न लावल्याने एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू झाला. महापालिकेने साधे बॅरिकेड्सही मॅनहोलजवळ लावले नाही. त्यांच्या या निष्काळजीमुळे डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला, असे व्यापारी संघटनेने याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबई महानगरपालिका