Join us

‘लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या अत्याचाराचा अहवाल द्या’; उच्च न्यायालयात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:14 AM

१६ एप्रिल रोजी इराणी दांम्पत्य बाहेर गेले असता पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ३०-४० फटके दिले. तर वकिलांच्या मुलांनी फेरीवाल्यांबाबत तक्रार केल्यावर मारहाण केली.

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या तीन प्रकरणांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ही जनहित याचिका फिरदौस इराणी आणि दोन वकिलांच्या मुलांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

१६ एप्रिल रोजी इराणी दांम्पत्य बाहेर गेले असता पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ३०-४० फटके दिले. तर वकिलांच्या मुलांनी फेरीवाल्यांबाबत तक्रार केल्यावर मारहाण केली. या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी याचिककर्त्यांनी केली आहे. याचिकेत उल्लेख करण्यात आल्याव्यतिरिक्त मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. निजामुद्दीन जमादार यांनी मुंबईत आणखी काही असे प्रकार घडल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण अहवाल सादर करू, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

३० मार्च रोजी राजू देवेंद्र (२२) मध्यरात्री नातेवाइकांकडे जात होता. त्याला जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले. तो चोरी करायला जात असताना पकडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. १८ एप्रिल रोजी सागीर खान नळबाजार येथे जात होता. डोंगरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मारहाण केली.

टॅग्स :उच्च न्यायालयमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस