विरार आगीचा अहवाल १५ दिवसांत सादर करणार

By Admin | Published: August 18, 2016 04:05 AM2016-08-18T04:05:07+5:302016-08-18T04:05:07+5:30

विरार स्थानकात मंगळवारी रात्री केबल बॉक्सला लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीकडून

Report of Virar Fire will be submitted in 15 days | विरार आगीचा अहवाल १५ दिवसांत सादर करणार

विरार आगीचा अहवाल १५ दिवसांत सादर करणार

googlenewsNext

मुंबई : विरार स्थानकात मंगळवारी रात्री केबल बॉक्सला लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीकडून १५ दिवसांत अहवाल सादर केला जाईल. आगीच्या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या सेवेला मोठा फटका बसला होता. विरार स्थानक घडलेल्या घटनेत शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगीचे कारण शोधण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिने बोरीवली ते विरार दरम्यान असणाऱ्या सर्व सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णयही उच्चस्तरीय पातळीवर घेण्यात आला आहे. अहवालानंतर आवश्यक ते बदल यंत्रणेत करण्याचा विचार केला जाईल. हा अहवाल महाव्यवस्थापकांना सादर केला जाणार आहे. एखादी आगीची घटना घडल्यास लोकल सेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी काही उपाययोजना करता येतात का याची चाचपणी केली जाईल,अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Report of Virar Fire will be submitted in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.