Join us

निंदनीय आरोप मागे घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

निंदनीय आरोप मागे घ्यावेतसुधा भारद्वाज यांचा एनआयए व एनआयएच्या वकिलांविरोधात न्यायालयात अर्जनिंदनीय आरोप मागे घ्यावेतएल्गार परिषद ...

निंदनीय आरोप मागे घ्यावेत

सुधा भारद्वाज यांचा एनआयए व एनआयएच्या वकिलांविरोधात न्यायालयात अर्ज

निंदनीय आरोप मागे घ्यावेत

एल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा वकिलांविरोधात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात जे निंदनीय आरोप केले आहेत, ते मागे घेण्याचे आदेश एनआयए व त्यांच्या वकिलांना द्यावेत, असा अर्ज एल्गार परिषदप्रकरणी आरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांनी विशेष न्यायालयात सादर केला.

एनआयए व विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांच्या बेजबाबदार वागणुकीबद्दल त्यांना समज द्यावी आणि भविष्यात त्यांना अशी विधाने करण्यापासून रोखावे, अशी मागणी भारद्वाज यांनी केली. एनआयएने सादर केलेल्या उत्तरात आपली बदनामी होईल, असे आरोप केले आहेत. एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या उत्तरावर तपासअधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांनी सही केली आहे. हे आरोप तथ्यहीन आहेत, असे भारद्वाज यांचे म्हणणे आहे.

* साक्षीदारांची ओळख खोदून बाहेर काढण्याचा प्रयत्न!

- हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या अर्जाद्वारे आरोपी सुधा भारद्वाज या वरील साक्षीदारांची ओळख खोदून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांना नुकसान करण्यात येईल, असे एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

तर, अंडरट्रायल्स असल्याने आपण निर्दोष असल्याचे गृहीत धरण्यात येते. एनआयएने जे उत्तरात म्हटले आहे, त्याबाबत त्यांच्याकडे पुरावा नाही आणि त्यामुळे साक्षीदारांचे नुकसान होऊ शकते. कायदेशीर युक्तिवादाच्या नावाखाली न्यायालयाला निंदा करण्याच्या व्यासपीठावर आणू नये, असे भारद्वाज यांनी अर्जात म्हटले आहे.

...............................