Join us  

प्रजासत्ताक दिनी संचलन पथकाला मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:33 AM

प्रजासत्ताक दिन व महाराष्टÑ दिनी दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर संचलन आणि कवायती करीत, उपस्थितांची मने जिंकणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला या वर्षीपासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे.

- जमीर काझीमुंबई : प्रजासत्ताक दिन व महाराष्टÑ दिनी दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर संचलन आणि कवायती करीत, उपस्थितांची मने जिंकणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला या वर्षीपासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे. त्यांना या दिवशी पौष्टिक अननसाचा शिरा व केळी दिली जाणार आहेत. आतापर्यंत त्याची त्या बदल्यात केवळ दूध किंवा लस्सीवर बोळवण केली जात होती. मुंबईचे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अल्पोहार बदलाबाबत पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून पोलिसांना हा अल्पोहार दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.२६ जानेवारी व १ मे रोजी दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाºया शासकीय समारंभात मुंबई पोलिसांकडून चित्तथरारक संचलन केले जाते. कार्यक्रमाच्या चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मैदानावर तीन वेळा तालीम, तर पूर्वदिनी एकदा रंगीत तालीम घेतली जाते. त्यासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासून दुपारपर्यंत जवानांना हजेरी लावावी लागते. मैदानावर घाम गाळल्यानंतर जवानांना भूक लागली असताना, त्यांना सरकारी खर्चात केवळ लस्सी किंवा दूध, बिस्किटे आणि दोन केळी दिली जायची. त्यामुळे भूक भागत नसल्याने जवानांना स्वखर्चाने बाहेर जाऊन खावे लागत असते.अल्पोहारावर केल्या जाणाºया या अत्यल्प खर्चाबद्दल जवानांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे सशस्त्र दलाच्या विभागप्रमुखांनी लस्सी किंवा दुधाऐवजी त्यांना घनरूपात आहार म्हणून अननसचा शिरा द्यावा, असा प्रस्ताव बनविला होता. पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल यांनी तो मंजुरीकरिता महासंचालक कार्यालयाकरवी राज्य सरकारकडे पाठविला. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिलीआहे.रंगीत तालमीला पूर्वीसारखाच नाश्तानव्या निर्णयानुसार संचलन पथकातील प्रत्येक जवानाला या वर्षीच्या २६ जानेवारीला अननसाचा शिरा आणि दोन केळी दिले जाणार आहेत. मात्र, तयारी आणि रंगीत तालमीच्या चार दिवसांसाठी पूर्वीप्रमाणेच लस्सी किंवा दूध, बिस्किट्स आणि दोन केळी दिली जातील.प्रजासत्ताक व महाराष्टÑ दिनाच्या संचलन पथकाला द्यावयाच्या मोफत अल्पोहाराची सुविधा देण्याची जबाबदारी सशस्त्र विभागातील अप्पर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय पुरवठादारांशी संपर्क करून लस्सी व दूध आणि दर्जेदार शिरा उपलब्ध करण्याची व्यवस्था करावयाची आहे.

टॅग्स :पोलिस