बेस्ट प्रश्नावर मध्यस्थीची मुख्यमंत्र्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:03 AM2017-08-05T03:03:52+5:302017-08-05T03:03:54+5:30

महापौर दालनात पाच वेळा बैठका होऊनही बेस्टला आर्थिक मदत देण्याची मागणी रखडली आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळातच बेस्ट कामगारांनी संपाचा इशारा दिल्यामुळे, रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

 Request the Chief Minister to intervene on the best question | बेस्ट प्रश्नावर मध्यस्थीची मुख्यमंत्र्यांना विनंती

बेस्ट प्रश्नावर मध्यस्थीची मुख्यमंत्र्यांना विनंती

Next

मुंबई : महापौर दालनात पाच वेळा बैठका होऊनही बेस्टला आर्थिक मदत देण्याची मागणी रखडली आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळातच बेस्ट कामगारांनी संपाचा इशारा दिल्यामुळे, रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होणार आहेत. महापौर दालनात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपा सरकारपुढे शरणागती पत्करत, हा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थीची विनंती केली आहे.
बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसºया दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. तीन दिवस उपोषण सुरू असले, तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकºयांची भेट घेतलेली नाही. याच दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले.
७ आॅगस्टपासून बेस्ट कर्मचाºयांनी संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौरांनी गटनेत्यांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकी आधीच महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून, बेस्टसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे. बैठकीतही याबाबत गटनेत्यांना माहिती देण्यात आली.

Web Title:  Request the Chief Minister to intervene on the best question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.