उष्णतेच्या लाटेपासून करा बचाव
By admin | Published: March 6, 2017 02:34 AM2017-03-06T02:34:38+5:302017-03-06T02:34:38+5:30
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे
मुंबई- हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. परिणामी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सुचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या असून, त्याचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
>हे करा
तहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्या
हलके, पातळ आणि सुती कपडे वापरा
गॉगल्स, छत्री, टोपी, बुटचा वापर करा
प्रवास करताना सोबत पाण्याची बाटली ठेवा
उन्हात काम करताना कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाका
लस्सी, लिंबू-पाणी, ताक प्या
चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
गुरांनी छावणीत ठेवा, त्यांना पुरेसे पाणी द्या
घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा
कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करा
पहाटेच्यावेळी अधिकाधिक कामे करा
>हे करू नका
लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका
दुपारी १२ ते ३.३० यावेळेत उन्हात जाणे टाळा
गडद, घट्ट, जाड कपडे घालणे टाळा
तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळा