Join us

उष्णतेच्या लाटेपासून करा बचाव

By admin | Published: March 06, 2017 2:34 AM

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे

मुंबई- हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. परिणामी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सुचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या असून, त्याचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.>हे करातहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्याहलके, पातळ आणि सुती कपडे वापरागॉगल्स, छत्री, टोपी, बुटचा वापर कराप्रवास करताना सोबत पाण्याची बाटली ठेवाउन्हात काम करताना कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकालस्सी, लिंबू-पाणी, ताक प्याचक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यागुरांनी छावणीत ठेवा, त्यांना पुरेसे पाणी द्याघर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर कराकामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करापहाटेच्यावेळी अधिकाधिक कामे करा>हे करू नकालहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नकादुपारी १२ ते ३.३० यावेळेत उन्हात जाणे टाळागडद, घट्ट, जाड कपडे घालणे टाळातापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळाउन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळा