लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत १४ आणि १७ वर्षीय दोन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दलाल श्वेता गोवळकर (३४) हिला अटक केली आहे.
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी अनैतिक व्यापाराच्या उद्देशाने अपहरणासह पोक्सो अंतर्गत दलाल महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.
मुलींना पैशांचे आमिष श्वेता गोवळकर ही ठाणे परिसरात राहते. ती घरकाम करते. ती अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवत ग्राहकांकडे पाठवत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. मुलुंड पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास मुलुंड चेकनाका येथील एका हॉटेलमधून मुलींची सुटका केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.