पोषण आहाराच्या ‘चवी’तून शिक्षकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:47 AM2018-10-27T04:47:28+5:302018-10-27T04:47:45+5:30
अध्यापनापेक्षा अन्नधान्याचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून आता मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई : अध्यापनापेक्षा अन्नधान्याचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून आता मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही.
स्वयंपाकी, मुख्याध्यापक किंवा शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशा तीनपैकी एकाने आहाराची चव घेऊन नोंद केली तरी चालणार आहे. मात्र यापुढे विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्यास नेमके जबाबदार कोणाला धरायचे, हा सवाल उपस्थित होत आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी होणार असली, तरी विषबाधेसारखे प्रकार झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या शुद्धिपत्रकामुळे फार काही बदल होत नसले तरी फक्त मानसिक समाधान मुख्याध्यापकांना मिळेल. त्यामुळे अशी जबाबदारी कमी न करता ती निश्चित केली गेली तर खºया अर्थाने मुख्याध्यापकांची यातून सुटका होईल आणि त्यांना इतर कामांसाठीही वेळ मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली.