Join us

आयआयटीत संशोधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:40 AM

देशाच्या प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रांत संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आयआयटीमध्ये संशोधन क्षेत्रात गेल्या १० वर्षांत चांगले काम झाले आहे.

मुंबई : देशाच्या प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रांत संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आयआयटीमध्ये संशोधन क्षेत्रात गेल्या १० वर्षांत चांगले काम झाले आहे. आयआयटीमधून पीएचडी करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीसंख्येतही वाढ दिसून येत असल्याची माहिती आयआयटीचे संचालक प्रा. देवांग खख्खर यांनी दिली.आयआयटी बॉम्बेमध्ये शनिवारी ५५ व्या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात संचालक खख्खर यांनी आयआयटीचा शैक्षणिक अहवाल सादर केला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. त्याचबरोबर सिप्ला कंपनीचे अध्यक्ष डॉ. युसुफ हमीद, आॅस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाच्या कुलगुरू मार्गरेट गार्डनर, अधिसभा सदस्य आणि बोर्ड आॅफ गव्हर्नरचे सदस्य आदी मंडळी उपस्थित होती. या समारंभात औषधनिर्माणशास्त्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिप्ला कंपनीचे अध्यक्ष डॉ.युसुफ हमीद यांना विज्ञान शाखेची ‘डॉक्टर’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.संचालक खख्खर यांनी अहवाल सादर करताना सांगितले की, गेल्या १० वर्षांत संशोधनात दुपटीने वाढ झाली ही आनंदाची बाब आहे. दहा वर्षांत पीएचडी करणाºया विद्यार्थ्यांची संख्या १८० वरून ३५० पर्यंत वाढली आहे. २०१६-१७ मध्ये ९२४ संशोधनांचा अभ्यास सुरू झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गेल्या १० वर्षांत पदवी अभ्यासक्रमात दुपटीने आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीसंख्येत तिपटीने वाढ झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कचºयाचा इंधन म्हणून वापरगोव्यात लवकरच कचºयापासून निर्माण केलेल्या जैविक वायूचा इंधन म्हणून वापर करण्यात येणार आहे. या जैविक वायूवर चालणाºया बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहेत. गोव्यामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची महती परराज्यांपर्यंत पोहोचली आहे. आयआयटीमधून घेतलेल्या अत्युच्च ज्ञानाचा वापर करून देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नक्कीच सहभागी व्हा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या वेळी विद्याार्थ्यांना केले. तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने मोठे बदल होत आहेत. त्याचा वापर दैनंदिन कामात केल्यास विकास साध्य होऊ शकतो असेही ते म्हणाले.आयआयटीच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभात एकूण २ हजार ६१२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. पीचएडीच्या एकूण ३५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्याार्थ्यांना ‘उत्कृष्ट शोधप्रबंध’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तंत्रज्ञान विषयात पदवी घेणाºया ६१६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.