मुंबई : खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे होणाºया मृत्यूचे संशोधन करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात पाच सदस्यीय समिती नियुक्त करावी. या समितीमार्फत स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची निश्चिती समिती करेल. त्याबरोबरच संसर्गजन्य आजारांमुळे होणाºया मृत्यूचेदेखील संशोधन समितीने करावे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी सांगितले.ठाणे, पुणे यांसह राज्यातील अन्य भागांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी विधान भवनात बैठक घेतली.आरोग्यमंत्री म्हणाले की, ठाणे, पुणे महापालिका क्षेत्रातील तसेच ज्या भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत आहे अशा ठिकाणच्या प्रत्येक खासगी रुग्णालयाचा प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हे करावा. त्यामध्ये संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची माहिती घेऊन त्याचे वर्गीकरणकरावे.ठाणे आणि पुणे येथे हा सर्व्हे सक्तीचा करण्यात आला असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागासोबतच महापालिका आरोग्य अधिकाºयांनी तातडीने यासंदर्भात कार्यवाही करावी, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात मंजूर खाटांच्या २ ते ३ टक्के खाटा राखीव करून स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करावा. व्हेंटिलेटर वापराबाबत प्रोटोकॉल करून त्याचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले.राज्यात गेल्या सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ३३८ मृत्यू झाले. त्यातील ५ जण राज्याबाहेरचे आहेत. सर्वाधिक मृत्यू नाशिक येथे झाले असून, त्यांची संख्या ३७ एवढी आहे. त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात ३१ तर ग्रामीण क्षेत्रात २३ मृत्यू झाले आहेत. नागपूर व औरंगाबाद येथे प्रत्येकी २४, ठाणे येथे २१, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर येथे प्रत्येकी २0, मुंबई १५, अमरावती १३, अकोला, कोल्हापूर येथे प्रत्येकी १0, सातारा, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ९, परभणी, सांगली, उस्मानाबाद, नवी मुंबई, रायगड येथे प्रत्येकी ३, बीड, धुळे, वाशिम, जळगाव, पालघर, जालना येथे प्रत्येकी २ तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. अन्य ५ मृतांमध्ये कर्नाटक येथील २ तर मध्य प्रदेश येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.डेंग्यू, मलेरियासदृश आजाराच्या रुग्णांचे मॅपिंग करावेतापाच्या रुग्णांसंदर्भात तसेच डेंग्यू, मलेरियासदृश आजाराच्या रुग्णांचे मॅपिंग करावे. बाधित रुग्ण वाढण्यामागील कारणांचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने संशोधन करावे. खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे होणाºया मृत्यूची निश्चिती करण्यासाठी सर्व महापालिका क्षेत्रात संशोधन समिती तातडीने नियुक्त करावी. त्यामध्ये आरोग्य उपसंचालक अथवा त्यांचा प्रतिनिधी, महापालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रतिनिधी, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा प्रतिनिधी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट अशा पाच सदस्यीय संशोधन समितीची रचना असावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. संसर्गजन्य आजाराच्या मृत्यूचा अहवालदेखील स्थानिक आमदारांना १५ दिवसांतून द्यावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू मृत्यूच्या निश्चितीसाठी पालिका क्षेत्रात संशोधन समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 4:08 AM