२०० विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:20 PM2020-05-23T18:20:35+5:302020-05-23T18:20:58+5:30

६ लाख ५२ हजार रेल्वे तिकीट आरक्षित

Reservation of 200 special trains is strong | २०० विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण जोरात

२०० विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण जोरात

Next

 

मुंबई :  देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाच्यावतीने १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या  सुरु करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर २१ मेपासून तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात केली. शनिवारपर्यंत ऑनलाईन ६ लाख ५२ हजार ६४४  तिकिटे आरक्षित झाली. यासह तिकिट खिडक्यावरून देखील तिकीट विक्री सुरु आहे.

देशातील वेगवेगळ्या भागातून २००  वातानुकूलित आणि सामान्य श्रेणीच्या ट्रेन धावणार आहेत. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून देशभरात ट्रेन धावणार आहे. देशातील मजुरांना त्यांच्या मूळगावी  सोडण्यासाठी 'श्रमिक विशेष ट्रेन' चालविण्यात १ मेपासून चालविण्यात येत आहे. २१ मेच्या सकाळी १० वाजतापासून आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर रेल्वे गाड्याचे बुकिंग सुरु झाले आहे. १ मेपासून सुरू झालेल्या सध्याच्या श्रमिक विशेष गाड्या आणि  १२ मे पासून नवी दिल्ली पासून काही प्रमुख मार्गावर ३० विशेष वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या व्यतिरिक्त आहेत. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाइल अँपद्वारे या गाड्यांच्या तिकिटांसाठीचे  ऑनलाईन आरक्षण केले जात आहे. 

भारतीय रेल्वेने २१ मे रोजीपासून तिकीट खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि तिकीट दलालामार्फत तिकिटांच्या आरक्षणास परवानगी दिली. १४ लाख १३ हजार २७७ प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी ६ लाख ५२ हजार ६४४ ऑनलाईन तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.

Web Title: Reservation of 200 special trains is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.