समाजातील महत्त्वाचा सदस्य मानला गेलेला तृतीयपंथीय वर्गासाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे. रेल्वे बोर्डाने तृतीयपंथींयाना हक्काचे स्थान देण्याकरिता आरक्षण प्रक्रियेत बदल करण्यासाठी परिपत्रक काढले आहे. पश्चिम रेल्वेला हे पत्र प्राप्त झाले असून आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’-‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी आद्यक्षराचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीयांच्या हक्काबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचा रेल्वेमंत्रालयाने आढावा घेत तो अमंलबजावणीसाठी रेल्वेबोर्डाकडे पाठवला. त्यानूसार तिकिट आरक्षण करताना स्त्री-पुरुष या प्रवर्गासह तृतीयपंथीय प्रवर्गाचा समावेश करावा. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिमने (सीआरआयएस) देखील सॉफ्टवेअर मध्ये टी या अद्याक्षराचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिमला (पीआरएस) देखील आॅनलाईन आरक्षण प्रक्रियेत ‘टी’ या आद्याक्षराचा समावेश करण्यास सांगितले आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली या बाबत निर्णय देत लिंग प्रकारात स्त्री-पुरुष-तृतीयपंथीय या प्रवर्गाचा समावेश करावा, असा निकाल दिला. रेल्वेच्या निर्णयामुळे सुमारे देशातील पाच लाख तृतीयपंथीयांना फायदा होणार आहे.
तृतीयपंथीयांना रेल्वेत हक्काचे स्थान, ‘टी’ आद्यक्षराने करता येणार आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 9:55 PM
रेल्वे बोर्डाने तृतीयपंथींयाना हक्काचे स्थान देण्याकरिता आरक्षण प्रक्रियेत बदल करण्यासाठी परिपत्रक काढले आहे. पश्चिम रेल्वेला हे पत्र प्राप्त झाले असून आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’-‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी आद्यक्षराचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे देशात तब्बल ४ लाख ९० हजारांपेक्षा जास्त तृतीयपंथीय असून या वर्गात साक्षरतेचे प्रमाण ५६.०७ टक्के राज्यात ४० हजार ८९१ तृतीयपंथीय असून साक्षरतेचे प्रमाण ६७.५७ टक्के