लिंगायत व ब्राह्मण यांनाही हवे आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:38 AM2018-12-02T06:38:18+5:302018-12-02T06:38:33+5:30
मराठा समाजापाठोपाठ धनगर व मुस्लीम समाज आरक्षणासाठी आग्रही झाला असतानाच, आमच्याही सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी राज्यातील ब्राह्मण समाजाने सरकारकडे केली आहे.
Next
मुंबई : मराठा समाजापाठोपाठ धनगर व मुस्लीम समाज आरक्षणासाठी आग्रही झाला असतानाच, आमच्याही सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी राज्यातील ब्राह्मण समाजाने सरकारकडे केली आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आम्हाला आरक्षण नको, पण ब्राह्मणांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण व्हायला हवे, असे म्हटले आहे. गुजरातमधील ब्राह्मणांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीला मात्र या महासंघाने पाठिंबा दिला आहे.
लिंगायत समाजातील काही जातींना ओबीसी म्हणून आरक्षण आहे, पण संपूर्ण लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी लातूरच्या तहसील कार्यालयापुढे धरणे धरण्यात आले होते.