Join us

'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:30 AM

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ आता संपला आहे. यामुळे आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरच मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. 

गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

आमदार भास्कर जाधव म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते, ते सत्तेत आले पण आरक्षण काही दिले नाही. लिंगायत समाजालाही त्यांनी असेच अश्वासन दिले आहे. भारतीय जनता पार्टी अशा गोष्टींचा वापर करुन सत्तेत येत आहेत, ४० दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: तिथे गेले होते, त्यांनी ४० दिवसांच्या आत आरक्षण देणार असल्याचे सांगितले. पण ४० दिवस होऊन गेले तरीही अजून मराठा आरक्षण जाहीर केलेले नाही हे लोक समाजाच्या भावनांशी खेळत आहेत, यामुळे आता प्रत्येक समाजात असंतोष उफाळून आला आहे. याला केंद्रातील आणि राज्यातील विद्यमान सरकार आहे, असा आरोपही आमदार भास्कर जाधव यांनी केला.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या शपथेवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा शब्द जर खरा झाला तर आनंदच आहे. २०१४ साली मी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत होतो तेव्हा नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. यावेळी मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले, त्यानंतर २०१४ साली भाजपचे सरकार आले. आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत गेले.  यावेळी काही लोकांना नोकऱ्याही मिळाल्या. त्यावेळी कोर्टाने मागावर्गीय समितीचे कारण देत तुर्तास ते आरक्षणाला स्थगिती दिली. पण २०१८ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी काहीही हालचाल केली नाही, त्यावेळी मराठा समाजाला कोर्ट, कचेरीमध्ये गुंतवण्याच काम त्यांनी केले, असा आरोपही जाधव यांनी केले. 

टॅग्स :भास्कर जाधवमराठा आरक्षणएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमनोज जरांगे-पाटील