- मनोहर कुंभेजकर
मुंबई- गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे या मथळ्याखाली आज सकाळी 10.44 मिनिटांनी लोकमत ऑनलाइन वर वृत्त पसरल्यावर त्यांचे जोरदार पडसाद उमटले. लोकमतच्या वृतांची दखल घेऊन शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना आज सायंकाळी पत्र देऊन गोराईत पक्षी अभयारण्यासाठी येत्या 2034 च्या विकास आराखड्यात जागा आरक्षित करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.आपल्या पत्रात नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणतात की,युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात गेल्या 25 जून पासून प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे.त्यांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या शनिवारी फ्लेमिंगो पक्षांचे थवे गोराई खाडी परिसरात नागरिकांना पाहायला मिळाले होते.
मुंबईत ठिकठिकाणी काँक्रीटचे जंगल उभे राहत असतांना मुंबई महानगर पालिकेच्या 2034 च्या नवीन विकास आरडखड्यात गोराई परिसरात पक्षी अभयरण्यासाठी जागा आरक्षित करावी.जेणेकरून पक्षी येथे मोठ्या संख्येने येतील आणि पक्षी प्रेमी व अभ्यासक यांना याचा मोठा उपयोग होईल.
1995 ते 1999 युती सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गोराई परिसरात पक्षी अभयरण्य साकारण्याची संकल्पना होती. याकडे त्यांनी आयुक्तांचे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शेवटी लक्ष वेधले आहे.