RBIने मुंबईतील या मोठ्या बँकेवर केली कठोर कारवाई, या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 08:41 AM2022-11-29T08:41:15+5:302022-11-29T08:43:58+5:30
Zoroastrian Co operative Bank: काही आवश्यक सूचनांचे पालन न केल्याने आरबीआयने मुंबईतील झोरोस्ट्रियन सहकारी बँकेवर(Zoroastrian Co-operative Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला १.२५ कोटी रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सूचनांचं पालन न केल्यास बँकांवर कारवाई केली जात असते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने ९ बँकांवर दंडात्मक कारवाई केली होती. आता केंद्रीय बँकेकडून मुंबईतील एका मोठ्या बँकेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. काही आवश्यक सूचनांचे पालन न केल्याने आरबीआयने मुंबईतील झोरोस्ट्रियन सहकारी बँकेवर(Zoroastrian Co-operative Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला १.२५ कोटी रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडामध्ये बिलांच्या सवलतींसंबंधित सूचनांच्या उल्लंघनाचा समावेश आहे.
या कारवाईसंदर्भात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, झोरोस्ट्रियन बँक एलसी आणि नियमांमधील तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. बँकेने अंतर्निहित व्यवहारांची आणि कागदपत्रांची सत्यता पडताळल्याशिवाय एलसी अंतर्गत घडभाड्यांची बिले वठवून घेतली आणि आठ वर्षांच्या कालावधीसाठी अभिलेखांना योग्य स्थितीमध्ये संरक्षित करण्यामध्ये अपयशी ठरली.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने इंडिनय मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, लखनौवर एनपीए संपत्तीच्या वर्गिकरणासंदर्भातील काही नियमांचं पान न केल्याने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने पाच अन्य सहकारी बँकांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर रिझर्व्ह बँकेने एका बड्या बँकेचा परवाना रद्द केला होता. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेने विविध बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याची नऊ सहकारी बँकांवर सुमारे १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये बेरहामपूर सहकारी शहरी बँक (ओदिशा), उस्मानाबाद जनता सहकारी बँक, महाराष्ट्र आणि संतरामपूर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरात यांचा समावेश होता.