नवीन विषाणूचे निदान झालेल्या रुग्णांसाठी जीटी रुग्णालयात राखीव खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:33+5:302020-12-30T04:08:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जीटी रुग्णालयात ब्रिटन आणि पश्चिम आशियामधून मुंबईत परतलेल्या रुग्णांना दाखल करून उपचार केले ...

Reserved bed at GT Hospital for patients diagnosed with new virus | नवीन विषाणूचे निदान झालेल्या रुग्णांसाठी जीटी रुग्णालयात राखीव खाटा

नवीन विषाणूचे निदान झालेल्या रुग्णांसाठी जीटी रुग्णालयात राखीव खाटा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जीटी रुग्णालयात ब्रिटन आणि पश्चिम आशियामधून मुंबईत परतलेल्या रुग्णांना दाखल करून उपचार केले जाणार आहेत. परदेशात कोरोना विषाणूच्या नव्याने आढळलेल्या प्रकारामुळे राज्यासह मुंबईत चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गोकूळदास तेजपाल (जीटी) या सरकारी रुग्णालयात अशा रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध केल्या आहेत.

जे ब्रिटन आणि पश्चिम आशियातून परत आले आहेत आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांच्यावर येथे उपचार केले जातील. या रुग्णांना दाखल करण्यासाठी फक्त जीटी रुग्णालयाची तरतूद केली आहे. जेणेकरून नव्या विषाणूच्या संसर्गामुळे अन्य कोरोना रुग्ण संक्रमित हाेणार नाहीत आणि संक्रमण पुढे पसरणार नाही. त्यांना इतरांपासून वेगळे करणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

जीटी रुग्णालयाच्या एका इमारतीत ४० खाटांचा उपयोग कोविडच्या व्यवस्थापनासाठी तर उर्वरित नॉन कोविड रुग्णांसाठी केला जाईल. आम्हाला सर्व कोविड पॉझिटिव्ह केसेस यूके किंवा मध्य पूर्वेकडून जीटी रुग्णालयात पाठविण्यास सांगितले आहे. इतर सर्व कोविडच्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. सेंट जॉर्ज रुग्णालयात २२० खाटा उपलब्ध असून सध्या फक्त ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

* कोविड केंद्रांमधील बरेचसे बेड रिक्त

शहर, उपनगरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यामुळे शहरातील इतर कोविड केंद्रांमध्येही खाटा रिक्त असून कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वांद्रे-कुर्ला जम्बो कोविड केंद्रात १ हजार २६ पैकी २७९ खाटा, तर दहिसर जम्बो सेंटरमध्ये ४४२ खाटांपैकी ८४ खाटा भरलेल्या आहेत. मुलुंडमध्ये १३५, सेव्हन हिल्स रुग्णालयात १,४९५ पैकी ६९१ खाटांवर तर नेस्को गोरेगावमध्ये २ हजार ४० खाटांपैकी केवळ १३६ खाटांवर रुग्ण आहेत.

................................

Web Title: Reserved bed at GT Hospital for patients diagnosed with new virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.