Join us

आरक्षित जागा कागदावरच!

By admin | Published: July 04, 2014 3:54 AM

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचा नियोजना अभावी बोजवारा उडाला असताना नव्याने दाखल होणाऱ्या बसेसमुळे उपक्रमाला काही प्रमाणात संजीवनी मिळण्याची शक्यता आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचा नियोजना अभावी बोजवारा उडाला असताना नव्याने दाखल होणाऱ्या बसेसमुळे उपक्रमाला काही प्रमाणात संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, गणेश घाट आगाराची जागा वगळता अन्य आरक्षित असलेल्या जागा अद्यापपर्यंत परिवहनच्या ताब्यात नसल्याने नव्या बस ठेवायच्या कुठे, असा यक्ष प्रश्न उपक्रमासमोर उभा ठाकला आहे.केडीएमसी परिक्षेत्रात परिवहन उपक्रमासाठी २८ जागा आरक्षित आहेत. सध्या उपक्रमात असलेल्या ७० बसेस या गणेश घाट आगारात उभ्या केल्या जातात़ संबंधित जागा अपुरी पडत असताना केंद ्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत नव्या १८५ बसेस उपक्रमात सप्टेंबर अखेर येणार आहेत़ तर अन्य २० बसेस या लवकरच दाखल होणार आहेत. आरक्षित जागांपैकी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोरील जागा, कल्याणमधील साधना हॉटेलसमोरील आणि डोंबिवलीमधील खंबाळपाडा येथील जागा या मोक्याच्या ठिकाणी आहेत. या जागांसाठी आग्रह धरला जात असून यासंदर्भात परिवहन सदस्य इरफान शेख, महेश जोशी यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे़याबाबत ठरावही पारित करण्यात आले आहेत़ परंतु, आजतागायत ठोस कार्यवाही यावर झालेली नाही. यासंदर्भात परिवहनचे सभापती रवींद्र कपोते यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, या प्रकरणी तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असून येत्या दोन दिवसांत आयुक्तांची भेट घेणार आहे, असे सांगितले तर केडीएमटीचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी १० जुलैपर्यंत खंबाळपाडा आणि विठ्ठलवाडी येथील जागा ताब्यात देण्याचे आश्वासन दिले.