तलावांमध्ये सहा महिन्यांचा जलसाठा झाला जमा; मुंबईकरांची चिंता होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:23 AM2020-08-11T02:23:05+5:302020-08-11T07:40:48+5:30

तूर्त तरी पाणीकपात राहील

The reservoirs accumulated water for six months | तलावांमध्ये सहा महिन्यांचा जलसाठा झाला जमा; मुंबईकरांची चिंता होतेय कमी

तलावांमध्ये सहा महिन्यांचा जलसाठा झाला जमा; मुंबईकरांची चिंता होतेय कमी

Next

मुंबई : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला आहे. तलाव क्षेत्रात आता सात लाख ५१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा पुढील १९७ दिवस म्हणजे साडेसहा महिने मुंबईची तहान भागवू शकेल. मात्र तलावांमध्ये आणखी ४८ टक्के जलसाठा कमी असल्याने २० टक्के पाणीकपात अशीच सुरू राहणार आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गतवर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये यंदा निम्म्याहून कमी जलसाठा आहे. त्यामुळे ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, आॅगस्ट महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरला आहे. परिणामी, एका आठवड्यात तलावांची पातळी १५ टक्क्यांनी वाढली आहे.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त सध्या
साठा (दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ७७९९६ १५६.७४
तानसा १२८.६३ ११८.८७ ७०९६३ १२४.३७
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.२७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२२
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ७५७२६ ५९८.४८
भातसा १४२.०७ १०४.९० ३८५७७८ १२८.४४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १०५५९९ २६९.०१

तलावांमध्ये जलसाठा
१० आॅगस्ट रोजी (दशलक्ष लीटर)
वर्ष जलसाठा टक्के
२०२० ७५१८०६ ५१.९४
२०१९ १३२३४८२ ९१.४४
२०१८ १२४१३२९ ८५.७९

Web Title: The reservoirs accumulated water for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.