महाराष्ट्रात स्वच्छ निसर्ग व स्वच्छ हवेसाठी पुन: निश्चय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:00 PM2020-06-13T18:00:47+5:302020-06-13T18:06:00+5:30

  सचिन लुंगसे मुंबई : भारतातील नागरिकांचे आयुर्मान वायु प्रदूषणामुळे ४ वर्षांनी कमी होऊ शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे. ...

Reset for clean nature and clean air in Maharashtra | महाराष्ट्रात स्वच्छ निसर्ग व स्वच्छ हवेसाठी पुन: निश्चय करा

महाराष्ट्रात स्वच्छ निसर्ग व स्वच्छ हवेसाठी पुन: निश्चय करा

Next

 

सचिन लुंगसे

मुंबई : भारतातील नागरिकांचे आयुर्मान वायु प्रदूषणामुळे ४ वर्षांनी कमी होऊ शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे. परिणामी तुमच्या आसपासच्या हवेला एका हिरोची गरज आहे. या कारणात्सव वायु प्रदूषणविरोधी लढयात सामील व्हा. आणि आपल्या परिसरातील सर्वाधिक वायु प्रदूषण करणा-या उद्योगांबाबत माहिती घ्या; आणि महाराष्ट्रात स्वच्छ निसर्ग व स्वच्छ हवेसाठी पुन: निश्चय करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाराष्ट्र स्टार रेटिंग कार्यक्रमांतर्गत करण्यात आले आहे. समाज माध्यमाद्वारे मंडळाकडून सातत्याने स्वच्छ हवेसाठी प्रयत्न करण्यात येत असून, या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे म्हणणेही मांडले जात आहे.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक उद्योग असलेल्या राज्यांपैकी एक आहे. ढासळत चाललेल्या वातावरणीय हवा गुणवत्तेचे एक कारण या उद्योगांमुळे होणारे वायु प्रदूषण आहे. महाराष्ट्र स्टार रेटिंग कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना औष्णिक वातावरणातील प्रदूषण आणि शहरांच्या वातावरणीय हवा गुणवत्तेची माहिती एकाच मंचावर समजण्यास मिळण्यास मदत होते आहे. महत्त्वाचे म्हणजे  उद्योगांना त्यांच्या कणयुक्त पदार्थांच्या उत्सर्जनाच्या आधारावर ५ स्टार प्रमाणात रेटिंग दिले जाते. १- स्टार रेटेड उद्योग सर्वाधिक प्रदूषणकारी असतात आणि ५ स्टार रेटिंग मिळालेले उद्योग कमी प्रदूषण करणारे असतात, असे महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे असून, महाराष्ट्रात स्वच्छ निसर्ग व स्वच्छ हवेसाठी पुन: निश्चय करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाला ३ वर्ष झाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. औद्योगिक उत्सर्जनामुळे आपण श्वास घेत असलेली हवा प्रदूषित होत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शहरातील हवा नेमकी कशामुळे प्रदूषित होते? हे आपणास माहित नसते. किंवा कोणते उद्योग वायू प्रदूषित करतात? याची माहिती मिळत नाही. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाराष्ट्र स्टार रेटिंग कार्यक्रमांतर्गत आपणाला आपल्या शहरातील सर्वाधिक वायु प्रदूषण करणा-या उद्योगांबाबत माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती मिळतानाच आपल्याला  ‘साफ हवा हिरो’ देखील बनता येत असून, पर्यावरण संवर्धनास हातभार लावता येत आहे.
 
......................

फायदे

  1. - महाराष्ट्रात ७५ हजारांपेक्षा जास्त उद्योगधंदे आहेत.
  2. - महाराष्ट्र देशातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे.
  3. - औद्योगिक वायू प्रदूषण उत्सर्जनासाठी स्टार रेटींग कार्यक्रमामध्ये उद्योगांची पर्यावरणीय कामगिरी जनतेसाठी जाहीर करून प्रदूषण कमी करण्याचे प्रमाण वाढवण्याची क्षमता आहे.
  4. - उद्योगांना त्यांनी केलेल्या प्रदूषक उत्सर्जनांची माहिती पुरवल्यामुळे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब वाढू शकतो.
  5. - एमपीसीबी आधीपासूनच औद्योगिक हवा प्रदूषक उत्सर्जनांचा डेटा गोळा करत आहे. त्यामुळे, ह्या कार्यक्रमासाठी तसा कोणताही खर्च नाही आणि परतावा जास्त आहे.
  6. - हवा प्रदूषक उत्सर्जने बराच काळ ट्रॅक करण्यासाठी औद्योगिक प्रगती पुस्तके नियमितपणे अद्ययावत केली जातील.
  7. - स्टार रेटींग इंडेक्स हा महाराष्ट्रातील रहिवाशांना राज्यातील औद्योगिक उत्सर्जनाबद्दल माहिती देण्याचा सोपा आणि सहज उपलब्ध असलेला मार्ग आहे.


......................

काय मिळते माहिती?

  • - आपल्या परिसरातील कुठला उद्योग अधिक वायु प्रदूषण करतो.
  • - वायु प्रदूषण व आपल्या परिसरातील हवा गुणवत्ते बद्दल अधिक माहिती घ्या.
  • - राज्यातील सर्वाधिक वायु प्रदूषण करणा-या उद्योगांबाबत माहिती घ्या.
  • - नागरिकांशी संवाद साधा, नवीन कल्पना सुचवा व उद्योगांसाठी प्रश्न अथवा सूचना सोडा.
  • - औद्योगिक परिसरात राहता? तुमच्या भोवती कारखाने किंवा मोठे उद्योग आहेत?

Web Title: Reset for clean nature and clean air in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.