मुंबई : मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरात लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मानखुर्द परिसरात शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी लपाछपीचा खेळ खेळत असताना लिफ्ट अंगावर पडल्याने एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिच्या निवासी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोसायटीतील अधिकाऱ्यांना अटकरेश्मा खरवी असे मृत मुलीचे नाव आहे. ती तिच्या मित्रमंडळीसोबत लपाछपी खेळत होती. खेळताना रेश्माची पाळी जेव्हा मित्रांना शोधायची आली तेव्हा तिने एका खिडकीत डोकावून पाहिलं जी खिडकी थेट लिफ्टमध्ये उघडते. रेश्माने डोके आत घालताच लिफ्ट आली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.
दिवाळीच्या सुट्टीला गेली अन् मृत्यू ओढवलाअपघात टाळण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी खिडकीला काच लावायला हवी होती, असे रेश्माचे वडील रवी खरवी यांनी सांगितले. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी प्रथम एफआयआर नोंदवला आणि आज दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कांबळे यांनी सांगितले की, या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर रेश्माचे कुटुंब मुंबईतील साठे नगरमध्ये राहते. तिची आजी मानखुर्द येथील हाउसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहते. रेश्मा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तिच्या आजीकडे आली होती.