लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे गुरुवारी वाटप केले. येत्या आठ दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सरचिटणीसांना दिलेली जबाबदारी अशी : विक्रांत पाटील-कोकण विभाग व पालघर जिल्हा, आमदार रणधीर सावरकर-विदर्भ, ॲड. माधवी नाईक-ठाणे विभाग, संजय केनेकर-मराठवाडा, मुरलीधर मोहोळ-पश्चिम महाराष्ट्र, विजय चौधरी-उत्तर महाराष्ट्र.
उपाध्यक्षांची जबाबदारी-माधव भंडारी-मुख्यालय व अहमदनगर उत्तर, अहमदनगर दक्षिण, चैनसुख संचेती-यवतमाळ, पुसद, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सुरेश हळवणकर-सांगली शहर, सांगली ग्रामीण, संजय भेगडे- सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण, साेलापूर उत्तर, राजेश पांडे-पुणे ग्रामीण, पुणे-मावळ, अमर साबळे-पुणे शहर, सातारा, स्मिता वाघ-धुळे शहर व ग्रामीण, जयप्रकाश ठाकूर-ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, ठाणे शहर, संजय भेंडे -भंडारा, वर्धा, अतुल काळसेकर-नवी मुंबई, उत्तर व दक्षिण रायगड, धर्मपाल मेश्राम-चंद्रपूर शहर व ग्रामीण, गोंदिया, गजानन घुगे-नांदेड शहर व ग्रामीण, परभणी शहर व ग्रामीण, विक्रम पावसकर-कोल्हापूर-हातकणंगले, कोल्हापूर पश्चिम, डॉ. अजित गोपचडे-बीड, धाराशिव, हाजी एजाज देशमुख-जालना, राजेंद्र गावित-नाशिक शहर, उत्तर नाशिक, दक्षिण नाशिक. याशिवाय प्रदेश सचिवांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.