मुंबई : मुंबई पोलिस दलात अंतर्गत मोठे खांदेपालट करत २८ उपायुक्तांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सात व मुंबईत बदली झालेल्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलाच्या अंतर्गत पोलिस आस्थापना मंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम यांना गुन्हे शाखा, परिमंडळ ६ चे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांना गुन्हे शाखा, गुन्हे शाखा उपायुक्त बलसिंग रजपूत यांना सायबर गुन्हे, गुन्हे शाखा उपायुक्त राजू भुजबळ यांना वाहतूक शाखा उपायुक्त विनायक ढाकणे यांना सशस्त्र पोलिस नायगाव, सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कालिनाचे उपायुक्त हेमराज राजपूत यांना परिमंडळ ६ येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
अशी करण्यात आली आहे नियुक्तीपरिमंडळ ८ चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांना गुन्हे शाखा (अंमलबजावणी), आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव यांना अंमली पदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा (प्रकटीकरण १) उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांना आर्थिक गुन्हे विभाग, परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर यांना अभियान विभाग, वाहतूक शाखेच्या (दक्षिण विभाग) उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांना सशस्त्र पोलिस दल ताडदेव, परिमंडळ ३ चे उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांना जलद प्रतिसाद पथक, जलद प्रतिसाद पथकाचे उपायुक्त श्याम घुगे यांना सुरक्षा विभाग, वाहतूक शाखेच्या (पश्चिम उपनगरे) उपायुक्त नितीन पवार यांना सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कालिना येथील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अभिनव दिलीपराव देशमुख यांना परिमंडळ २, मनोज पाटील यांना परिमंडळ ५, तेजस्वी सातपुते यांना मुख्यालय २, प्रवीण मुंढे यांना परिमंडळ ४, दीक्षितकुमार गेडाम यांना परिमंडळ परिमंडळ ८, अजयकुमार बन्सल परिमंडळ ११ आणि मोहित कुमार गर्ग यांची गुन्हे शाखा (प्रतिबंधक) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल सुभाष पारसकर यांना परिमंडळ ९, सहा. पो. महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), एम. रामकुमार यांना मुख्यालय १, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथून बदली होऊन आलेल्या गौरव सिंग यांना वाहतूक शाखा (दक्षिण विभाग), राज्य राखीव पोलिस बल गट क्र. २ पुणे येथून बदली होऊन आलेल्या मंगेश शिंदे यांना वाहतूक शाखा (पश्चिम उपनगरे), नवी मुंबई, वाहतूक शाखा येथून बदली होऊन आलेल्या यांना पुरुषोत्तम कराड परिमंडळ ७ आणि नागरी हक्क संरक्षण नाशिक येथून बदली होऊन आलेल्या अकबर पठाण यांना परिमंडळ ३ येथे नेमणूक करण्यात आली आहे.परमबीर सिंह खंडणीप्रकरणात पठाण यांच्यावर गुन्हामीरा-भाईदरमधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन गेल्या वर्षी जुलै महिन्यात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी परमबीर यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, आशा कोरके, खासगी व्यक्ती सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त असलेल्या अकबर पठाण यांची नाशिक येथे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. राज्यात सत्ता बदल होऊन आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने पठाण यांची पुन्हा मुंबईत बदली दाखविण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत नियुक्ती दिल्यानंतर आता त्यांना मध्य मुंबईतील महत्वाच्या अशा परिमंडळ तीनच्या उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे. परिमंडळ तीनच्या अंतर्गत भायखळा, नागपाडा, आग्रिपाडा, चिंचपोकळी, महालक्ष्मी, ताडदेव आणि वरळी असा महत्वपूर्ण विभाग येतो.