प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:04 AM2018-12-25T06:04:45+5:302018-12-25T06:05:23+5:30

औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले.

Resident doctor news | प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते

प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते

googlenewsNext

मुंबई  - औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले. या कृतीचे तीव्र पडसाद राज्यातील अन्य शासकीय रुग्णालयांतही उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायन रुग्णालयातील डॉक्टरही फळविक्रेते होऊन विद्यावेतन थकविल्याचा निषेध करतील.
विद्यावेतन थकल्यामुळे नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही काळ्या फिती बांधून निषेध करत सोमवारी काम केले. याप्रमाणेच, राज्यातील अंबाजोगाई आणि लातूरच्या शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनीही विद्यावेतनाच्या मागणीसाठी काळ्या फिती बांधून सेवा केली. नागपूरच्या सरकारी मेडिकल महाविद्यालयातील डॉ.आशुतोष जाधव यांनी याविषयी सांगितले की, गेल्या ५० दिवसांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. येत्या २-३ दिवसांत आम्ही हॉस्टेल ते अधिष्ठाता कार्यालयापर्यंत मोर्चाही काढणार आहोत. राज्यातील निवासी डॉक्टरांना पाठिंबा देत, मंगळवारी सायन रुग्णालयातील डॉक्टरही फळविक्रेते बनणार आहेत.

Web Title: Resident doctor news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.