Join us

प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 6:04 AM

औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले.

मुंबई  - औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले. या कृतीचे तीव्र पडसाद राज्यातील अन्य शासकीय रुग्णालयांतही उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायन रुग्णालयातील डॉक्टरही फळविक्रेते होऊन विद्यावेतन थकविल्याचा निषेध करतील.विद्यावेतन थकल्यामुळे नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही काळ्या फिती बांधून निषेध करत सोमवारी काम केले. याप्रमाणेच, राज्यातील अंबाजोगाई आणि लातूरच्या शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनीही विद्यावेतनाच्या मागणीसाठी काळ्या फिती बांधून सेवा केली. नागपूरच्या सरकारी मेडिकल महाविद्यालयातील डॉ.आशुतोष जाधव यांनी याविषयी सांगितले की, गेल्या ५० दिवसांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. येत्या २-३ दिवसांत आम्ही हॉस्टेल ते अधिष्ठाता कार्यालयापर्यंत मोर्चाही काढणार आहोत. राज्यातील निवासी डॉक्टरांना पाठिंबा देत, मंगळवारी सायन रुग्णालयातील डॉक्टरही फळविक्रेते बनणार आहेत.

टॅग्स :डॉक्टरमुंबई