‘मेस्मा’च्या भीतीने निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:40 AM2019-08-09T03:40:40+5:302019-08-09T03:41:03+5:30

संप स्थगित करून डॉक्टर सेवेत रुजू

Resident doctor's termination for fear of 'Mesma' | ‘मेस्मा’च्या भीतीने निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

‘मेस्मा’च्या भीतीने निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

Next

मुंबई : मार्डच्या निवासी डॉक्टरांनी बुधवारी सुरू केलेला बेमुदत संप अखेर स्थगित केला. विद्यावेतन आणि राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक कायद्यातील जाचक अटींचा निषेध करण्यासाठी त्यांनी कामबंद करून बेमुदत संप पुकारला होता. मात्र, संपकरी डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिल्याने गुरुवारी सकाळी संप स्थगित करून डॉक्टर सेवेत रुजू झाले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय व निवासी डॉक्टरांमध्ये बुधवारी यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले. त्यानंतर निवासी डॉक्टरांनी बेमुदत पुकारलेला हा संप अखेर मागे घेण्यता आला.

...तर पुन्हा संपाचा इशारा
सेंट्रल मार्ड अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, नागपूर, लातूर, अकोला आणि अंबेजोगाईतील निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन दोन दिवसांत देण्यात येईल. दोन महिन्यांची क्षय, प्रसूती रजा मान्य केली आहे. १५ दिवसांत कॅबिनेटमध्ये विद्यावेतनवाढीची मागणी केली जाईल; ५ हजारांचे वाढीव विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून खात्यात जमा होईल. मात्र, सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही, तर ३१ आॅगस्टला पुन्हा संप करण्यात येईल.

Web Title: Resident doctor's termination for fear of 'Mesma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.