सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांच्या भेटीने रहिवाशी आनंदले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:49 PM2018-10-18T22:49:13+5:302018-10-18T23:56:23+5:30
चित्रपट सृष्टीत स्वतःचे अस्तित्व असलेले सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांचे आजोळ असलेल्या प्रभाविनायक सोसायटीत नवरात्रोत्सवाच्या 51 व्या वर्षानिमित्त भेट देत देवीचे दर्शन घेतले त्यांच्या भेटीने सोसायटीतील रहिवाशी आनंदित झाले.
मुंबई - चित्रपट सृष्टीत स्वतःचे अस्तित्व असलेले सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांचे आजोळ असलेल्या प्रभाविनायक सोसायटीत नवरात्रोत्सवाच्या 51 व्या वर्षानिमित्त भेट देत देवीचे दर्शन घेतले त्यांच्या भेटीने सोसायटीतील रहिवाशी आनंदित झाले.
प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाच्या 51 व्या वर्षानिमित्त पत्रकार रजनिकांत साळवी यांनी लिहिलेल्या गेल्या 50 वर्षांचा लेखाजोखा असलेल्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट ते कलरफुल या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुभाष सारंग, कार्यवाह प्रदीप देढीया, सोसायटीचे अध्यक्ष आत्माराम बंडबे, कार्यवाह दीपक जाधव, यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई, किसन सारंग, दत्ता म्हात्रे यांच्यासह सर्व रहिवाशी उपस्थित होते.
संजय जाधव यांनी हजेरी लावताच सोसायटीतील रहिवाशांनी त्यांचे स्वागत केले पुस्तकाची संकल्पना व नवरात्रोत्सव मंडळाचा 50 वर्षाचा मांडलेला लेखा जोखा नक्कीच गौरवास्पद असून भावी पिढीला त्यापासून प्रेरणा देणारा असाच आहे असे कौतुक त्यांनी केले.
यावेळी त्यांनी सोसायटील पूर्वीच्या आठवणी व किस्से सांगितले त्यानंतर महिलांनी त्यांना दांडिया रास खेळण्याचा आग्रह केला. कोणाकडूनही वर्गणी न घेता उत्सव गेली 50 वर्षे कसा साजरा होत गेला केवळ उत्सव म्हणून नव्हे तर उत्सवातून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अनेकांनी घेतलेली मेहनत अनेक आठवणी या पुस्तकातून मांडण्यात आल्या असल्याचे रजनिकांत साळवी यांनी सांगितले.