गोरेगाव न्यू म्हाडा वसाहतीतील रहिवासी मर्कटलिलेमुळे हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:34 AM2021-02-05T04:34:45+5:302021-02-05T04:34:45+5:30

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील न्यू म्हाडा वसाहत, नागरी निवारा परिषद येथील परिसरामध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. मर्कटलिलेमुळे ...

Residents of Goregaon New Mhada colony harassed by Mercatile | गोरेगाव न्यू म्हाडा वसाहतीतील रहिवासी मर्कटलिलेमुळे हैराण

गोरेगाव न्यू म्हाडा वसाहतीतील रहिवासी मर्कटलिलेमुळे हैराण

Next

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील न्यू म्हाडा वसाहत, नागरी निवारा परिषद येथील परिसरामध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे.

मर्कटलिलेमुळे येथील रहिवासी हैराण झाले आहेत. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता या माकडांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथील स्थानिक रहिवासी मोठ्या दहशतीखाली असून, सदर माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी श्री समर्थ फेडरेशनच्यावतीने न्यू म्हाडा इमारत क्र. २ - ३ फेडरेशनचे अध्यक्ष सुनील थळे व सरचिटणीस प्रकाश येजरे यांनी वन विभाग अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली पूर्व कार्यालयाकडे केली आहे.

येथील परिसरात गेल्या १० ते १२ महिन्यांपासून माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. सकाळ होताच इमारत क्रमांक १ पासून ते थेट इमारत क्रमांक २८ पर्यंतच्या नागरिकांच्या घरात माकडे शिरत असून, दिवसभर हा सिलसिला सुरूच असतो. माकडांच्या या उपद्रवामुळे परिसरातील वस्तूंची नासधूस करत आहेत. तसेच इमारतीमधील घरांमध्ये घुसून सामानाचं, महत्त्वाच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. इतकेच नव्हे तर काही घरांमध्ये घुसून माकडांनी छोट्या मुलांना इजा पोहोचवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मर्कटलिलेतून सदर परिसर मुक्त कारण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी श्री समर्थ फेडरेशन ई. क्र. २/३ न्यू म्हाडा कॉलनी यांनी शिवसेना विधी मंडळ, मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्याकडेसुद्धा केली आहे.

---------------------------------------------

Web Title: Residents of Goregaon New Mhada colony harassed by Mercatile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.