रहिवाशांनी श्वानाच्या ५ पिल्लांना केले वेगळे; मालाडमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 03:07 AM2019-02-10T03:07:07+5:302019-02-10T03:07:38+5:30

सोसायटीत अडसर ठरतात म्हणून श्वानाच्या पाच पिल्लांना सोसायटीतून गूढरीत्या गायब केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे.

The residents made the 5 pups of the dogs different; Shocking type of Malad | रहिवाशांनी श्वानाच्या ५ पिल्लांना केले वेगळे; मालाडमधील धक्कादायक प्रकार

रहिवाशांनी श्वानाच्या ५ पिल्लांना केले वेगळे; मालाडमधील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे

मुंबई : सोसायटीत अडसर ठरतात म्हणून श्वानाच्या पाच पिल्लांना सोसायटीतून गूढरीत्या गायब केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. महिनाभराने या प्रकरणी मालाड पोलिसांनी सोसायटीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या पाच पिल्लांचे गूढ कायम आहे.
मालाड मार्वे रोडवरील आदर्श हेरिटेज को-आॅप. हाउसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. मालाडचे रहिवासी असलेले भावीन भट (३०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भावीन हे मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशन या संस्थेतर्फे प्राण्यांवर प्राथमिक उपचार करतात. याच सोसायटीमधून मोहित नावाच्या मुलाने येथील श्वानावर उपचार करण्यासाठी भटला बोलावून घेतले होते. त्यानुसार, भटने सोसायटीतील पिल्लावर उपचार केले. तेव्हा तेथे श्वानासह ५ पिल्ले होती.
दर १५ दिवसांनी भट हा पिल्लांना बघण्यासाठी सोसायटीत जात होता. १० जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे पिल्लांना पाहण्यासाठी गेला तेव्हा, तेथे एकही पिल्लू न दिसल्याने त्याने सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली, तेव्हा सोसायटीची माहिती देणार नसल्याचे त्याने सांगितले.
सुरक्षारक्षकाने दिलेल्या या उत्तरामुळे भटला संशय आला. त्याने तेथील रहिवासी मोहितकडे चौकशी केली. मोहितसह त्याने पुन्हा सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली तेव्हा सोसायटीच्या कमिटी सदस्यांनी पिल्लांना बाहेर टाकायला सांगितले. त्यानुसार, पाचही पिल्ले मीठचौकी येथील नर्सरी परिसरात सोडून दिल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केली.
भटने नर्सरी परिसराकडे धाव घेतली. मात्र तेथे पिल्ले सापडली नाहीत. त्यामुळे पिल्लांना अन्न व निवाऱ्यापासून वंचित केले म्हणून, सोसायटीच्या पदाधिकाºयांविरोधात त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अखेर गुरुवारी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभरानंतर तक्रार दाखल
महिनाभराने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप घटनास्थळाची पाहणी केलेली नाही. त्या पिल्लांचे नेमके झाले काय? त्यांना ठार केल्याची भीती आहे. सुरुवातीपासून ते कुठेही नैसर्गिक विधी करत असल्याने सोसायटीकडून त्यांना विरोध होता. शिवाय, या सोसायटीत मोठे चार श्वान आहेत. या श्वानांसह त्यांच्या पिल्लांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षक ठेवले असल्याचेही समजते. मोठे श्वान हातात येत नसल्याने त्यांनी त्यांच्या पिल्लांना टार्गेट केले. यामुळे पिल्लांच्या आईची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सोसायटीवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत तक्रारदार भावीन भट्ट यांनी व्यक्त केले.

पिले आईपासून दुरावली
सोसायटीत चार मोठे श्वान आहेत. सोसायटीतील रहिवाशांना या श्वानांचा त्रास होत असल्यामुळेच त्यांना येथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यातच श्वानाची पिलेही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत होती. त्यामुळेच त्यांनी या पिलांना आईपासून दूर केले, असे आरोप करत तक्रारदाराने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The residents made the 5 pups of the dogs different; Shocking type of Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई