म्हाडा वसाहतीतील रहिवासी कचरा, डासांमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:58 AM2019-07-20T00:58:30+5:302019-07-20T00:58:33+5:30

कचऱ्याचा ढिगारा तर इमारतीमध्ये असणा-या जनरेटर रूममध्ये पाण्याच्या डबक्यांमुळे दुर्गंधीबरोबरच डासांचा वाढता त्रास, त्यात रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने त्याचाही फटका.

Residents of MHADA colony suffer from garbage, mosquitoes | म्हाडा वसाहतीतील रहिवासी कचरा, डासांमुळे त्रस्त

म्हाडा वसाहतीतील रहिवासी कचरा, डासांमुळे त्रस्त

Next

मुंबई : बैठ्या घरांमागे कचऱ्याचा ढिगारा तर इमारतीमध्ये असणा-या जनरेटर रूममध्ये पाण्याच्या डबक्यांमुळे दुर्गंधीबरोबरच डासांचा वाढता त्रास, त्यात रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने त्याचाही फटका. हे एखाद्या झोपडपट्टीतील परिस्थिती नसून म्हाडा वसाहतीचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलुंड पूर्वेकडील म्हाडा रहिवासी या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत पालिकेकडे तक्रार केल्यास कचºयाचा भाग विकासाचा असल्याचे सांगून थेट बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. तर, स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वेळ नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे जायचे कुणाकडे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
गेली अनेक वर्षे न्यू पी.एम.जी.पी. इमारतीचे म्हाडा अंतर्गत पुनर्विकासाचे काम सुरू आहे. म्हाडाने ज्या विकासकाला इमारत बांधण्याचे काम दिले आहे तो विकासक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. इमारतीची सुरक्षा भिंत ही शेजारी असणाºया बैठ्या चाळींना लागून आहे. या भिंतीलगतच कचºयाचा ढिगारा साचला आहे. या कचºयामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
विकासकाने भिंतीलगत लावलेल्या झाडांच्या फांद्या वेळोवेळी न छाटल्याने, पावसाळ्यात या फांद्या घरांवर पडून घरांचे नुकसान होते. म्हाडा कॉलनी बस डेपो ते मासळी बाजार या रस्त्यावरून रोज हजारोंच्या संख्येने नागरिक ये-जा करीत असतात. परंतु गेली अनेक वर्षे हा रस्ता नादुरुस्त असल्याने पादचाऱ्यांना येथून चालणे त्रासदायक ठरत आहे. लोकप्रतिनिधी तसेच म्हाडा प्रशासनाला येथील रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनदेखील कोणीच या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
>जबाबदारी विकासकाची...
हा संपूर्ण परिसर म्हाडाने खाजगी विकासकाला पुनर्विकास करण्यासाठी दिला आहे. रस्ता दुरुस्त करणे, कचरा उचलणे व झाडांच्या फांद्या वेळोवेळी छाटणे ही कामे विकासकाची आहेत. म्हाडाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महानगरपालिका यात कोणतीच कारवाई करू शकत नाही, असे टी विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी स्पष्ट केले.
>विकासकाला नोटीस
इमारतीच्या भिंतीशेजारील परिसर लवकरच स्वच्छ करण्यात येईल. सदर रस्ता विकासकाने महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावा यासाठी मी गेले सहा महिने पाठपुरावा करीत आहे. परंतु विकासक रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास तयार नाही. त्यामुळे विकासकला महानगरपालिकेने ३०५ ची नोटीस बजावली आहे.
- प्रभाकर शिंदे, नगरसेवक वॉर्ड क्र. १०६
>चाळीतच बरे...
या विभागाचा पुनर्विकास म्हाडा करीत असल्यामुळे लोकप्रनिधी आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. खड्डे, कचरा, डासांचा प्रादुर्भाव याबद्दल तक्रार करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. इमारतीत राहायला गेल्यावर वाटले की आता आमचे जीवन सुखकर होईल. परंतु समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे चाळीतच बरे होतो असे वाटते.
- विजय खामकर, स्थानिक रहिवासी
इमारतीच्या भिंतीलगतच आमची घरे असल्यामुळे इमारतीच्या झाडांचा रोज त्रास होतो. त्या झाडांमध्ये वडाचा व नारळांचा समावेश असल्याने या झाडांची मुळे आमच्या घरांचा पाया कमजोर करीत आहेत. बरेच दिवस कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधी व डासांचा सामना करावा लागतो.
- दत्ताराम दळवी, स्थानिक रहिवासी
>पालिकेने केली लोकाग्रहास्तव कामे...
कॉलनीतील लोकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेकडे बºयाचदा पाठपुरावा केला. परंतु या विभागात विकासकामे सुरू असल्यामुळे पालिका अधिकारी हतबलता दाखवत आहेत. तरीदेखील उद्यान व घनकचरा विभागाने आपल्या अखत्यारीत नसतानाही लोकाग्रहास्तव कामे केली आहेत.
- रवी नाईक, अध्यक्ष,
म्हाडा कॉलनी असोसिएशन

Web Title: Residents of MHADA colony suffer from garbage, mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.