Join us

अखेर जोगेश्‍वरी शामनगर परिसरातील नागरिकांना मिळणार पाईप गॅस जोडणी

By मनोहर कुंभेजकर | Published: June 25, 2024 5:44 PM

काही तांत्रिक अडचणींमुळे स्थगित असलेले काम लवकरच होणार पूर्ण

मुंबई-जोगेश्‍वरी पूर्व विभागामध्ये शामनगर परिसरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर रोड, डी जी वायकर रोड येथील सर्व इमारती मध्ये पाईप गॅसची सोय करण्यासाठी गेल्या आठ दहा वर्षांपासून उबाठाच्या माध्यमातून प्रयत्न करुन गॅस पाईप लाईन दोन वर्षापुर्वी टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. मात्र मजास बस आगार समोर जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथे काही तांत्रिक अडचणींमुळे आणि विशेष म्हणजे गॅस वितरण कंपनी आणि म.न.पा. (के/ पूर्व)विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे सदर काम स्थगित होते. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त होते. 

या संदर्भात दि. ३१ मे २०२४ रोजी गॅस वितरण कंपनीच्या बांद्रा (पूर्व) बी. के. सी. येथील मुख्य कार्यालया मध्ये वरीष्ठ अधिकारी  शाहनवाज खान , इरफान शेख, संभाजी शिंदे यांची भेट संयुक्त बैठक घेउन सविस्तर चर्चा करण्यात आली.

म. न. पा. के पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून  मनपा गॅस वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांंचा समन्वय घडवून आणला व तांत्रिक अडचणींमुळे स्थगित असलेले काम सुरू करण्यास भाग पाडले.त्यामुळे रहिवाश्यांना लवकरात लवकर घरगुती गॅस कनेक्शन मिळण्यासाठी उबाठाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे सदर काम प्रगतीपथावर असून लवकरच या विभागातील लिली व्हाईट को. आँ. हौ. सो., जॉय व्हेलेंन्सिया, ब्ल्यु मिडोज्, ऐश्वर्या हाईट्स, ओम श्री गणेश सोसायटी, आणि त्या परीसरातील असंख्य रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे. 

सदर संयुक्त बैठकीला उबाठाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी,माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर,उपविभागप्रमुख बाळा साटम, तसेच शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, प्रदीप गांधी, मंदार मोरे, रवी सोगम, शैलेश बांदेलकर, नितीन गायकवाड, दिपक तोंडलेकर उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबई