सुभाष नगरच्या रहिवाशांना मिळणार ग्रंथालय; खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून कामाला झाली सुरुवात

By मनोहर कुंभेजकर | Published: June 14, 2023 06:55 PM2023-06-14T18:55:45+5:302023-06-14T18:55:57+5:30

घर छोटे आणि घरच्या घरी बसून अभ्यास करणे अतिशय कठीण झाले होते.

Residents of Subhash Nagar will get a library; The work was started with the funds of MP Gajanan Kirtikar | सुभाष नगरच्या रहिवाशांना मिळणार ग्रंथालय; खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून कामाला झाली सुरुवात

सुभाष नगरच्या रहिवाशांना मिळणार ग्रंथालय; खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून कामाला झाली सुरुवात

googlenewsNext

मुंबई : अंधेरी ( पूर्व )सुभाष नगर येथील रहिवाशांच्या शिकणाऱ्या मुली व मुलांना राहत्या परिसरात अभ्यासासाठी शांत किंवा सोबर वातावरण नव्हते.घर छोटे आणि घरच्या घरी बसून अभ्यास करणे अतिशय कठीण झाले होते.

ही अडचण बघता समाजसेवक भिमेश मुतुला व संजयकुमार कलकोरी यांनी संकल्पना साधून उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर याच्यांकडे पाठपुरावा केला.आणि येथील विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे ग्रंथालय येथील धर्मासोनू वेल्फेअर सोसायटीच्या  शेड जागेवर भव्य  ग्रंथालय वास्तू कीर्तिकर यांच्या खासदार निधीतून उभारली जात आहे.या 
ग्रंथालयात विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके उपलब्ध असतील.सकाळी ७ ते रात्री पर्यंत विद्यार्थी येथे अभ्यास करतील अशी माहिती मुतुला यांनी दिली.

या कामात भाजपचे नेते मुरजी पटेल यांचे ही विशेष सहकार्य असून या स्थळाचे भूमीपूजनात स्थानिकांचे अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.सदर कामाचे भूमिपूजन  खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुरजी पटेल ,माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे  भिमेश मुतुला , संजीव कलकोरी , प्रशांत पात्रे , जगदीश सिह व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Residents of Subhash Nagar will get a library; The work was started with the funds of MP Gajanan Kirtikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.