Join us

पश्चिम उपनगरातील नागरिकांना पावसाळ्यात कुठलीही असुविधा होता कामा नये यासाठी सतर्क राहा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2023 10:18 AM

अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांचे पालिका प्रशासनाला आदेश

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-मुंबई महानगर पालिकेचे नव नियुक्त अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांनी पश्चिम उपनगरा मधील सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची के ( पूर्व) विभागात एक संयुक्त बैठक आयोजित केली होती.विशेष म्हणजे ही मॅरेथॉन बैठक काल दुपारी १२ ते संध्याकाळी ६.३० पर्यंत सुरु होती. पश्चिम उपनगर मधील नागरिकांना पावसाळा मध्ये कोणतीही अडचण येऊ नये याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे खूपच गंभीर असंल्याचे दिसून आले.

बैठक दरम्यान पावसाळा पूर्व तयारीचा संपूर्ण आढावा घेत सर्व सहाय्यक आयुक्ताना पावसाळ्यात नागरिकांना कुठलीही असुविधा होता नये ह्या दृष्टीने सतर्क राहून, शिल्लक कामे दोन दिवसात पूर्ण करायचे आदेश दिले. तसेच पश्चिम उपनगर मधील सर्व विभाग मधील काही महत्वाचे कामाचा आढावा घेतला आणि लवकरच प्रत्येक विभागात प्रत्यक्ष येऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

 सदर सभेला पश्चिम उपनगर मधील परिमंडळ ३ चे सहआयुक्त रणजित ढाकणे,परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार,परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे तसेच एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त  स्वप्नजा क्षीरसागर. के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, के पश्चिम विभागाचे  सहाय्यक आयुक्त  डॉ. पृथ्वीराज चौहान, पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त  राजेश अक्रे, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, आर दक्षिण सहायक विभागाचे आयुक्त ललित तळेकर, आर मध्य विभागाच्या सहाय्य्क आयुक्त संध्या नांदेडकर, आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर तसेच कार्यकारी आरोग्य अधिकारी  मंगला गोमारे आणि इतर विभाग आरोग्य अधिकारी देखील उपस्थित होते.

 सदर बैठकीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविल्याप्रमाणे प्रत्येक विभागात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या भागात योजना मध्ये निर्धा ताबडतोब सुरु करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्ताना दिले. तर सदर बैठकीत उपस्थित उपायुक्त ( आरोग्य )  संजय कुऱ्हाडे यांनी आपला दवाखाना संकल्प पूर्ण करणेसाठी विभागात संपूर्ण सहकार्य आणि व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासित केले.

टॅग्स :मुंबई