राष्ट्रवादीत ‘कागदावरच्या’ पदांचे राजीनामा सत्र
By admin | Published: December 6, 2014 11:26 PM2014-12-06T23:26:17+5:302014-12-06T23:26:17+5:30
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणोश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत 15 वर्षात पदांना कधीच महत्त्व राहिले नव्हते.
Next
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणोश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत 15 वर्षात पदांना कधीच महत्त्व राहिले नव्हते. नाईकांचा विश्वास हेच पद समजले जात होते. परंतु पक्षांतराच्या चर्चेमुळे पदाधिकारी कागदावर असलेल्या पदांचा राजीनामा देऊन दबाव वाढवू लागले आहेत.
नवी मुंबईच्या राजकारणावर अडीच दशकांपासून गणोश नाईक व त्यांच्या कुटुंबाची एकहाती पकड होती. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या गोटात असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी गणोश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश करावा, असा आग्रह पदाधिका:यांनी धरला आहे. या वृत्तामुळे तीन दिवसांपासून नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षाचे पदाधिकारी पदांचा राजीनामा देऊन नेत्यांवर व पक्षावर दबाव टाकणार आहेत. वाशीतील नगरसेवक व पक्षाचे वाशी तालुका कार्याध्यक्ष किशोर पाटकर यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा तालुका अध्यक्ष भरत नखाते यांच्याकडे दिला आहे. याविषयीचे पत्र शनिवारी दिवसभर सोशल मीडियामधून फिरत होते. या पत्रविषयी माहिती घेण्यासाठी पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. नखाते यांनी सांगितले की, ‘मी बाहेरगावी आहे. अशा प्रकारचे कोणतेही पत्र मला मिळालेले नाही. पत्र बनावट असू शकते.’
नाईक परिवाराने भाजपामध्ये प्रवेश करावा यासाठी पदाधिकारी पक्षाचे राजीनामे देणार असल्याची चर्चा आहे. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर मागील 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदांना काहीही महत्त्व देण्यात आलेले नाही. वॉर्ड अध्यक्ष ते जिल्हा अध्यक्ष सर्व पदे फक्त कागदावरच आहेत. पदाधिका:यांना काहीही अधिकार नाहीत. नगरसेवक व इतर पदाधिका:यांनी लावलेल्या होर्डिग्जवर जिल्हा अध्यक्षांचे फोटो कधीच दिसत नाहीत. राज्याच्या प्रदेश अध्यक्षांचेही फोटो दिसत नाहीत. नाईकांचा विश्वास हेच सर्वात मोठे पद समजले जाते. ज्यांनी विश्वास संपादन केला त्यांना नगरसेवकपदाच्या उमेदवारीपासून इतर पदेही दिली गेली आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पदाधिकारी कागदावरील पदांचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नगरसेवक पदांपेक्षा पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊन दबावतंत्र वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
च्राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदावर गोपीनाथ ठाकूर अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु पक्षातील काही नगरसेवक व पदाधिका:यांना जिल्हा अध्यक्षांचे नावही सांगता येत नाही. जिल्हा अध्यक्षपद नामधारीच आहे. शहरातील होर्डिग्जवरही त्यांचे फोटो टाकले जात नाहीत.
च्सद्य:स्थितीत पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे माहितीसाठी ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘अद्याप माङयाकडे कोणीही राजीनामा दिला नसून याविषयी मला काहीही माहिती नाही,’ असे ठाकूर यांनी सांगितले.
1नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाच्या एका नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हे वृत्त समजल्यापासून आम्ही संदीप नाईक व गणोश नाईक यांच्याशी संपर्क साधत आहोत. परंतु त्यांचे स्वीय साहाय्यक त्यांना फोन देत नाहीत. आम्हाला विश्वास आहे की ते राष्ट्रवादीमध्येच थांबतील.
2राष्ट्रवादीने त्यांना नवी मुंबईत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मानाची पदे मिळाली. निवडणुकीत यशापयश येतच असते. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करू नये. वाशीतील मेळाव्यात भरत नखाते व इतर पदाधिका:यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेविषयी मात्र या पदाधिका:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.