तळोजा डम्पिंग ग्राउंडला विरोध
By Admin | Published: April 14, 2015 12:10 AM2015-04-14T00:10:59+5:302015-04-14T00:10:59+5:30
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या सध्या सर्वच प्रमुख शहरे, उपनगरांनामध्ये गंभीर होत चालली आहे
तळोजा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या सध्या सर्वच प्रमुख शहरे, उपनगरांनामध्ये गंभीर होत चालली आहे. डम्पिंग ग्राऊंड हे गृहसंकुले, पाणीव्यवस्था, ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या आदी महत्त्वाच्या ठिकाणापासून दूर असणे आवश्यक आहे. मात्र तळोजा येथे प्रस्तावित घनकचरा प्रकल्प उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तळोजातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रस्ताव रद्द करून गुरचरण जमीन संबंधित ग्रामपंचायतींना परत करावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तळोजा येथील प्रस्तावित घनकचरा प्रकल्प हा माथेरान इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रापासून तसेच प्रसिद्ध हाजी मलंग दर्ग्यापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर आहे. त्याचप्रमाणे कुशिवली धरणापासूनही नजीक आहे. या प्रकल्पापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही अवघ्या १० किमी अंतरावर आहे. भविष्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांना यामुळे बाधा देण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित तळोजा घनकचरा प्रकल्पाची जमीन ही राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली होती. ही गुरचरण जमीन असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी स्थानिक ग्रामपंचायतींना वा स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र त्यांना पूर्णत: अंधारात ठेवण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डम्पिंग ग्राऊंडमुळे प्रदूषणात वाढ होण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
च्प्रस्तावित तळोजा प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबतचा अहवाल निरी या संस्थेने तयार आला आहे. या अहवालातही प्रकल्पाचे डिझाईन, बांधकाम व कार्यवाहीच्या टप्प्यात दुर्गंध, धूळ, जमिनीची धूप, सुरक्षिततेला धोका प्रदूषण या समस्यांचा उल्लेख आहे.
च् पर्यावरण नियमांची पायमल्ली करत, केलेल्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रस्ताव रद्द करून गुरचरण जमीन ग्रामपंचायतींना परत करावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.