गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 08:03 PM2018-10-03T20:03:33+5:302018-10-03T20:03:48+5:30

मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालकांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Resolve the question of housing societies in priority - Chief Minister | गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - मुख्यमंत्री 

गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - मुख्यमंत्री 

Next

मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालकांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सहकार पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवार आणि नेत्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच हौसिंग सोसायटीचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवून भाजपा प्रणित सर्व पक्षीय स्व. रघुवीर सामंत सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. सहकार पॅनेलचे २१ पैकी २१ उमेदवार जिंकून आले. केवळ हौसिंग सोसायट्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतल्याने त्याचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीवर झाला. त्यामुळेच हा विजय शक्य झाल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. 

निवडणूक फेडरेशन ऐवजी संस्था स्तरावर निवडणुका घेणे, पुनर्विकासात वाढीव आकाराचे घर, डीम्ड कन्व्हेन्स अशा योजना जाहीर शासनाने जाहीर केल्या. पण अजूनही अनेक अडचणी गृहनिर्माण संस्थांसमोर आहे. त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तेव्हा गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले असून, त्याचे उर्वरित प्रश्न सुद्धा प्राधान्याने सोडविले जातील, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.  

यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांच्या समवेत, सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक आनंदराव गोयल, विठ्ठल भोसले, जिजाबा पवार यांच्यासह फेडरेशनचे नवनिर्वाचित २१ संचालक उपस्थित होते.

Web Title: Resolve the question of housing societies in priority - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.