Join us

कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या तक्रारींचे निराकरण करा - विनायक राऊत 

By मनोहर कुंभेजकर | Published: May 29, 2023 7:42 PM

विनायक राऊत यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची भेट घेतली.

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची भेट घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रतोद,आमदार सुनील प्रभू  यांनी मुंबई,ठाणे इथे राहणाऱ्या चाकरमान्यांना कोकण वासियांना कोकण रेल्वे रिझर्वेशन संदर्भात होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाकडे शिवसेनेची भूमिका मांडून त्यांच्या समस्यांचे लवकर निराकारण होण्यासाठी बैठक आयोजित करा अशी आग्रही मागणी केली होती. आज खासदार विनायक राऊत यांना घेऊन कोकण रेल्वे रिझर्वेशन संदर्भात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची शिवसेनेच्या शिष्टमंडळा सोबत भेट घेतली यावेळी कोकण रेल्वे संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली.

तसेच खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच  कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची देखिल भेट घेतली होती अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश कोरगावकर,अरूण दुधवडकर,सुधीर मोरे, बाबी देव, बाळा नर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईविनायक राऊत