लॉ च्या विद्यार्थ्याना कुलगुरूंमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:03 AM2018-05-06T06:03:05+5:302018-05-06T06:03:05+5:30
मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून अधिक वाढला होता. या पार्श्ववभूमीवर स्टुडंट लॉ कौन्सिलने विद्यापीठात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र त्या विद्यार्थ्यांना नवीन कुलगुरूंनी आता दिलासा दिला आहे. कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर आणि परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांनी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून अधिक वाढला होता. या पार्श्ववभूमीवर स्टुडंट लॉ कौन्सिलने विद्यापीठात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र त्या विद्यार्थ्यांना नवीन कुलगुरूंनी आता दिलासा दिला आहे. कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर आणि परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांनी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्याची अमंलबजावणी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे देण्यात आली. त्यामुळे स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे आंदोलन तूर्तास तरी मागे घेण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेचे हजारो विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. निकालासाठी वाट पाहावी लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लॉ शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करीत विद्यापीठाविरोधात आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. दरम्यान विद्यार्थी प्रतिनिधींच्या मध्यस्थीने स्टुडन्ट लॉ कौन्सिलने कुलगुरुंची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन कुलगुरुना सुपूर्द केले. त्यावर त्यांनी स्टुडन्ट लॉ कौन्सिलच्या मागण्या मान्य
करून त्यांच्या अमंलबजावणीचे आदेश परीक्षा नियंत्रकांना
दिले आहेत.
या मागण्या मान्य
विधी शाखेच्या सेमिस्टर १,३,५ प्रलंबित सर्व निकाल पुढिल १० दिवसात क्रमाक्रमाने लावण्यात येतील.
विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाची संधी मिळावी आणि त्यानंतरच पुढच्या परीक्षा घेतल्या जातील.
पुनर्मुल्यांकनाचे अर्ज भरल्यावर त्याचा निकाल १५ दिवसात जाहीर होईल.
सेमिस्टर १,३,५ च्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक तणावातुन दिलासा मिळावा व त्यांचे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित होउन पुढील परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी सेमिस्टर २,४,६ च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येतील.
परीक्षा फी मधे झालेली वाढ तत्काळ थांबवली जाइल.