CoronaVirus : जपानमध्ये आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:39 AM2020-04-28T03:39:45+5:302020-04-28T06:29:05+5:30

संदीप शिंदे मुंबई : कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी जपान सरकारने आणीबाणी जाहीर केली. मात्र, या आणीबाणीतही लोकशाही मूल्यांचा सन्मान ...

Respect for democracy even in emergency in Japan | CoronaVirus : जपानमध्ये आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान

CoronaVirus : जपानमध्ये आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान

Next

संदीप शिंदे
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी जपान सरकारने आणीबाणी जाहीर केली. मात्र, या आणीबाणीतही लोकशाही मूल्यांचा सन्मान करीत तेथे नागरिकांवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.
जपानमध्ये नागरी स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. सरकार लोकांना विनंती करू शकते, सक्ती नव्हे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, मॉल, बाजारपेठा, हॉटेल सुरू आहेत. सरकार रोज सकाळी ९ आणि दुपारी ३ वाजता देशभरात उद्घोषणा करून लोकांना विनंती करते. त्याचा आदर करत आणि स्वयंशिस्तीने ‘कोविड-१९’ला रोखण्याचे काटोकर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मूळचे ठाणेकर आणि सध्या जपानमध्ये वास्तव्याला असलेले शैलेंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
चीनला जपानी संस्कृती आणि तिथल्या ठिकाणांबद्दल खूप अप्रूप आहे. त्यामुळे जपानमध्ये येणाऱ्या परदेशी पाहुण्यांपैकी ६० टक्के चिनी नागरिक असतात. त्यानंतरही जपानमध्ये हा आजार नियंत्रणात आहे. आजघडीला जपानमध्ये १३ हजार ४४१ जण बाधित असून ३७२ जणांना मृत्यू झाला आहे. डायमण्ड प्रिंसेस क्रुझमुळे जपानमध्ये या रोगाचा शिरकाव झाला. सुरवातीला सरकार गंभीर नव्हते. परंतु, प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्य सेवांचे सक्षमीकरण आणि तपासण्यांचे प्रमाणही वाढले. आता मात्र वाढत्या रुग्णांचा ताण आरोग्य व्यवस्थेला असह्य होत आहे. कुणालाही स्वत:हून तपासणी करता येत नाही. लक्षणे आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती होते. सरकारने विनंती केल्यानंतर फूड कोर्ट बंद झाली आहेत. मॉल रात्री १० ऐवजी ७ वाजता बंद होतात. पहाटे पाचपर्यंत चालणारे पब रात्री ८ वाजता बंद होतात. कार्यालयीन वेळेनंतरच्या पार्ट्या, जेवणावळी लोकांनीच बंद केल्या आहेत.
देशात सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर वाढल्याने त्याचा प्रचंड तुटवडा आहे. एका व्यक्तीला एका वेळी एकच सॅनिटायझर विकत घेता येतो. मास्कसाठी आधी बुकिंग करावे लागते. त्याच्या किमतीसुद्धा चौपट झाल्या आहेत. ‘हायर अ‍ॅण्ड फायर कल्चर’ नसल्याने कुणालाही कामावरून काढले जात नाही. काही ठिकाणी वेतन कपात झाली आहे. तर, बेरोजगारांना एम्लॉयमेंट इन्शुरन्सअंतर्गत ६ महिने अर्थसहाय्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या फै लावामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जपान सरकार आपल्या प्रत्येक नागरिकाला एक लाख येन (७१ हजार रुपये) देणार असल्याचेही शैलेंद्र यांनी सांगितले.
>संस्कृतीतील फरक पथ्यावर
पाश्चिमात्य देश आणि जपानच्या संस्कृतीत मोठा फरक आहे. इथे एकमेकांना भेटल्यानंतर हात मिळविणे किंवा गालाला गाल लावले जात नाहीत. विशिष्ट अंतरावरून वाकून बो केले जाते. त्यामुळे फिजिकल डिस्टिन्सिंग कायम पाळले जाते. इथली ३० टक्के जनता कायम मास्कचा वापर करते. कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर्सचा वापर नित्याचा आहे. जेवणाच्या चॉपस्टिक एकदाच वापरल्या जातात. या संकटाच्या काळात ही संस्कृती पथ्यावर पडल्याचे शैलेंद्र नमूद करतात.
>आॅलिम्पिकचा आर्थिक भुर्दंड
जपानमध्ये आॅलिम्पिक स्पर्धांची जय्यत तयारी सुरू होती. परंतु, स्पर्धाच रद्द झाल्याने या देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. स्पर्धा रद्द होण्यापूर्वी जपानमधील रुग्णांची संख्या कमी होती. ती नंतर अचानक वाढली. स्पर्धा रद्द होऊ नये म्हणून हा आकड्यांचा खेळ झाला नव्हता ना, अशी शंका अनेकांना आहे.
>‘हंको’मुळे कार्यालयाच्या वाºया
जपानने आपल्या कामकाजात प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला असता, तरी आजही तिथे कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कागदपत्रांवर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाºयाचा स्टॅम्प (हंको) असावा लागतो. यामुळे आजही ५९ टक्के कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. ग्राहक हा देवासमान आहे. आपल्याला त्रास झाला तरी त्याला त्रास होऊ नये, या जपानी माणसाच्या प्रवृत्तीचा तो परिणाम असल्याचे शैलेंद्र यांनी नमूद केले.

Web Title: Respect for democracy even in emergency in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.