Join us

पावसाची विश्रांती, १२ सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:35 AM

जून आणि जुलै महिन्यात मुंबई शहरासह उपनगरात जोरदार बरसलेल्या पावसाने सप्टेंबरच्या सुरुवातीला मोठी विश्रांती घेतली आहे.

मुंबई : जून आणि जुलै महिन्यात मुंबई शहरासह उपनगरात जोरदार बरसलेल्या पावसाने सप्टेंबरच्या सुरुवातीला मोठी विश्रांती घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यासह मुंबईतही पाऊस विश्रांतीवर असून, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान मुंबईसह राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. परिणामी, हवामान कोरडे राहणार असून, उन्हाचा कडाका मुंबईकरांना तापदायक ठरणार आहे.जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुंबईत पाऊस जोरदार बसरला. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने जोर पकडला. नंतर मात्र मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कमी झाला. श्रावण सुरू झाल्यानंतर क्वचित एखाददुसरी सर आली.आता श्रावण महिना संपत आला असला तरी अजूनही हवामान कोरडेच आहे. त्यामुळे मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई शहर, उपनगरासह राज्याचा विचार करता ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.