रेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 07:21 AM2020-10-01T07:21:23+5:302020-10-01T07:21:34+5:30
मिशन बिगिन अगेन; लोकलमध्ये डबेवाल्यांना परवानगी
मुंबई : मिशन बिगिन अगेन, अर्थात ‘पुनश्च हरिओम’अंतर्गत राज्यातील रेस्टॉरंट, बार ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत.
अनलॉकच्या पुढच्या टप्प्यातील सवलती राज्य शासनाने बुधवारी जारी केल्या. त्यानुसार, राज्यांतर्गत लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात
येतील. मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील लोकलगाड्या सुरू होतील.
राज्यातील हॉटेल्स, फूड कोटर््स, रेस्टॉरंट आणि बार ५ आॅक्टोबरपासून सुरू होतील, पण ग्राहकांची उपस्थिती ५० टक्के वा स्थानिक प्राधिकाऱ्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे असेल. यासंदर्भात पर्यटन विभागाकडून स्वतंत्र नियमावली जारी करण्यात येणार आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रातील अत्यावश्यक नसणाºया औद्योगिक उत्पादनांचे कारखाने सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
लॉकडाऊन ३१ आॅक्टोबरपर्यंत
आधीपासून ज्या गतिविधींना लॉकडाऊनअंतर्गत केलेली मनाई व आज सवलत न दिलेल्या गतिविधींबाबतची मनाई ३१ आॅक्टोबरपर्यंत कायम राहील. कार्यालयांमधील उपस्थितीबाबतचा आधीचा आदेश कायम असेल.
प्रवास सुखकर
राज्यातील एका शहरातून निघून राज्यातीलच दुसºया शहरात जाणाºया रेल्वेगाड्या तत्काळ सुरू करणार.
मुंबईत लोकल ट्रेनची संख्या/फेºया वाढविण्यात येणार आहेत.
डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून क्यूआर कोड घ्यावा लागेल.
पुणे पीएमआर क्षेत्रातील लोकल
ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.
हे मात्र बंदच राहणार
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व
कोचिंग क्लासेस ३१ आॅक्टोबरपर्यंत बंद
चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे (मॉल्स, व्यापारी संकुलांसह), आॅडिटोरियम आदी बंद.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक (एमएचएने
दिलेली परवानगी वगळून) बंद राहील.
मेट्रो रेल्वे बंद राहील.
राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या संख्येने होणारे कार्यक्रम बंद. धार्मिक स्थळे बंद राहतील.
केंद्राच्याही सूचना;
शाळांचा निर्णय राज्यांवर
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशव्यापी अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना बुधवारी जारी केल्या. कंटेनमेंट झोन्स वगळून इतर ठिकाणी अनेक गोष्टी १ आॅक्टोबरपासून खुल्या होत आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्सेस, एंटरटेनमेंट पार्क्स सुरू करता येतील. शाळांचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. -वृत्त/७