रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:22 AM2024-01-17T10:22:24+5:302024-01-17T10:25:02+5:30

अंधेरी स्थानकातही 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु.

Restaurant experience in railway coaches at different stations in mumbai | रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स

रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स

मुंबई :

सीएमएमटी स्थलांतरित झाले पश्चिम रेल्वेने सुरत, वांद्रे टर्मिनस, वलसाड, लोअर परळ आणि वसई रोड स्थानकांवर असे आणखी रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु करण्याची योजना आखली आहे. बोरिवली आणि वांदे स्थानकांवर इतर रेस्टॉरंट ऑन व्हील्स'चे काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या (आता परळ येथे आहे) आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये रेस्टॉरंट ऑन व्हीलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला असेल. हा रेल्वेने सुरू केलेला नवा उपक्रम आहे. ज्यामध्ये जुन्या रेल्वे डब्यांचे सुशोभीकरण करून त्याचे दिमाखदार रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले जाते. आता पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकांतदेखील रेस्टॉरंट ऑन व्हील्स मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, अंधेरी स्थानकावर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले. या संकल्पनेअंतर्गत जुन्या, निरुपयोगी डब्यांचे एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये रूपांतरण केले जाते. हे रेस्टॉरंट सुधारित रेल्वे डब्यामध्ये जेवणाचा उत्तम अनुभव देईल. या संकल्पनेनुसार केलेला पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. या रेस्टॉरंटचे कंत्राट ओएएम इंडस्ट्रीजला देण्यात आले आहे. रेस्टॉरंटमध्ये एकावेळी ४८ ग्राहक बसू शकतात.

• प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि टेकवे काउंटर सुविधा पुरवण्यासाठी रेस्टॉरंट २४ बाय ७ सुरू असणार आहे. रेल्वे प्रवाशांची भूक भागवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे जेवणदेखील दिले जाईल.

 ९ अंधेरी स्थानकावर रेस्टॉरंटचे :

स्वयंपाकघरासह अत्याधुनिक डिझाइन केलेले रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले असून ते सेवेसाठी सज्ज आहे.

'मिठाई' रेस्टॉरंटचे खास आकर्षण :

रेस्टॉरंटचे खास आकर्षण म्हणजे मिठाई आणि स्नॅक्स, ज्यासाठी हल्दीराम जगभर प्रसिद्ध आहे. नॉन-फेअर रेव्हेन्यू या तिन्ही रेस्टॉरंटमधील एकूण कराराचे मूल्य ५.९४

Web Title: Restaurant experience in railway coaches at different stations in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.