राज्यात रेस्टॉरंट, बार आजपासून होणार सुरू; मुंबईत कामगारांचा तुटवडा भासणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:35 AM2020-10-05T05:35:14+5:302020-10-05T06:45:05+5:30

नियमांच्या अंमलबजावणीवर पालिकेचे लक्ष

restaurants bars get ready to open but face manpower and space constraints | राज्यात रेस्टॉरंट, बार आजपासून होणार सुरू; मुंबईत कामगारांचा तुटवडा भासणार

राज्यात रेस्टॉरंट, बार आजपासून होणार सुरू; मुंबईत कामगारांचा तुटवडा भासणार

Next

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट, बार मुंबईत ३३ टक्के तर राज्यात ५० टक्के क्षमतेने सोमवारपासून सुरू होत आहेत.

हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षिश सिंग कोहली यांनी सांगितले की, जे रेस्टॉरंट व बार सुरू होणार आहेत, त्यांनी सर्व तयारी केली आहे. आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, परराज्यांत गेलेले सर्व कामगार अजून परतले नसल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे.

... अन्यथा काही काळासाठी परवाना रद्द
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने हॉटेल व्यवसायावर महापालिकेचे बारीक लक्ष असणार आहे. ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, जागेचे निर्जंतुकीकरण, स्क्रीनिंग अशा व्यवस्था ठेवणे बंधनकारक असेल. याचे उल्लंघन केल्यास हॉटेलचा परवाना काही काळासाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा मुंबई पालिका प्रशासनाने दिला आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेलमालकाला पहिल्या वेळेस समज देण्यात येईल. मात्र, त्यानंतरही वारंवार असे घडल्यास, काही काळासाठी परवाना रद्द करणे अथवा हॉटेल बंद करण्यास लावणे, अशी कारवाई होऊ शकते.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

ग्राहक आणि कर्मचारी आमचे कुटुंब असून ती आमची जबाबदारी आहे. आम्ही योग्य ती काळजी घेऊ. सर्व नियमांचे पालन केले जाईल. ग्राहकांनीही आपल्या जबाबदारीचे पालन करावे.
- गुरबक्षिश सिंग कोहली, अध्यक्ष, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

जेवणासाठी अनेकजण कुटुंबातील सदस्य किंवा मित्र परिवारासोबत येतात. सोबत आल्यास त्यांना वेगवेगळे बसवता येणार नाही. त्यांना एकच टेबल दिले जाईल. तर वेगवेगळ्या व्यक्ती असतील, तर त्यांच्या टेबलमध्ये अंतर ठेवले जाईल.
- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष आहार

 

Web Title: restaurants bars get ready to open but face manpower and space constraints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल